PuneAccidentNewsUpdate : दोघांचे बळी घेणाऱ्या अल्पवयीन वेदांतचा अटक केलेला बाप विशाल अग्रवाल नेमका कोण आहे ?
पुणे : पुण्यात भरधाव असलेल्या पोर्शे कारने दोन इंजिनिअरला धडक दिली. यात दोन्ही इंजिनियरचा जागीच मृत्यू झाला. महत्वाचं म्हणजे ही पोर्शे महागडी आलिशान कार मद्यप्राशन करुन सतरा वर्षांचा मुलगा चालवत होता. या अपघातानंतर जमावाने सतरा वर्षाच्या मुलाला चांगलाच चोप देऊन पोलिसांकडे दाखल केले . हा मुलगा पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर असलेल्या विशाल अग्रवालचा मुलगा होता. सतराव्या वर्षी मुलाच्या हाती १ कोटी ८६ लाखांची गाडी दिली. या गाडीने दोन निष्पापांचा जीव घेतला. विशेष म्हणजे त्याच्या मोठ्या मुलानेही असाच अपघात केला होता मात्र त्यात काही वाहनांचे आणि विजेच्या खांबाचे नुकसान केले होते मात्र हे प्रकरण गाजावाजा होण्याच्या आतच मिटवण्यात आले होते.
विशाल अग्रवाल हा -ब्रम्हा कॉर्प या बांधकाम उद्योग समूहाचा प्रमुख आहे. ब्रम्हा कॉर्प हे नाव पुण्यातील बांधकाम व्यवसायात गेल्या चाळीस वर्षांपासून आघाडीवर आहे.ब्रम्हदत्त अग्रवाल यांनी स्थापन केलेल्या या उद्योगसमूहांमध्ये अनेक कंपन्या आहेत. पुण्यातील वडगाव शेरी, खराडी, विमान नगर या भागात अनेक मोठे गृहप्रकल्प या कंपनीने उभारले आहेत. त्याचबरोबर पुण्यातील ली मेरिडियन हॉटेल , रेसिडेन्सी क्लब यासारखी मोठी बांधकामे देखील या कंपनीने केली आहेत. यातील ब्रम्हा मल्टीस्पेस , ब्रम्हा मल्टीकॉन या कंपन्यांची जबाबदारी ब्रह्मदत्त अग्रवाल यांचा मुलगा सुरेंद्र अग्रवाल आणि त्यानंतर सुरेंद्र अग्रवाल यांचा मुलगा विशाल अग्रवाल यांच्याकडे आलेली आहे. विशाल अग्रवाल यांच्या मालकीच्या विविध कंपन्यांची मालमत्ता 60,120,000 इतकी असल्याचे सांगण्यात येते . विशाल अग्रवालला आलिशान गाड्यांचा शोक असून त्याच्याच अल्पवयीन मुलाने कल्याणी नगरमध्ये मद्य प्रश्न करून वेगाने कार चालवून दोघांचा बळी घेतला.
मोठ्या मुलानेही केला होता अपघात…
दरम्यान मात्र विशाल अग्रवाल यांचा मोठ्या मुलाने देखील काही महिन्यांपूर्वी वडगाव शेरी भागात ब्रम्हा मल्टी स्पेस या इमारतीसमोर आलिशान कार वेगाने चालवून रस्त्यावरील इतर वाहनांचे आणि विजेच्या खांबाचे नुकसान केले होते. मात्र त्या प्रकरणाचा गवगवा होणार नाही याची काळजी घेण्यात घेऊन प्रकरण मिटवण्यात आले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री आरोपी किशोर रात्री 9.30 ते पहाटे 1 वाजेच्या दरम्यान त्याच्या मित्रांसह या दोन ठिकाणी गेला होता आणि त्याने दारू प्राशन केली होती. पोलिस आयुक्त कुमार यांनी यापूर्वी सांगितले होते, “बारच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की किशोर दारू पीत आहे.
किशोर दारू पिऊन गाडी चालवत होता यात शंका नाही. ही सर्व वस्तुस्थिती आम्ही न्यायालयात मांडू.” पोलिसांनी किशोरच्या वडिलांविरुद्ध बाल न्याय कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन मुलाला दारू दिल्याप्रकरणी बार मालक आणि कर्मचाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, मोटारसायकल चालवणारे अनीस अवधिया आणि अश्विनी कोस्टा, दोघेही 24 वर्षांचे असून त्यांचा मृत्यू झाला. ते आयटी प्रोफेशनल होते आणि मूळचे मध्य प्रदेशचे होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय दंड संहितेच्या कलम 304 (हत्यासाठी नसलेल्या दोषी हत्या) आणि मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांनुसार किशोरवयीन मुलाविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. सत्र न्यायालयात जाऊन आरोपीला प्रौढ म्हणून खटला चालवण्याची परवानगी मागणार असल्याचे पोलिसांनी सोमवारी सांगितले होते.