Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : ओबीसी राजकीय आरक्षणासाठी भाजपचे राज्यात सर्वत्र आंदोलन

Spread the love

मुंबई : ओबीसींच्या आरक्षणाच्या मागणीसोबतच जातनिहाय जनगणना करा, राजकीय व इतर क्षेत्रातील व जिल्ह्यातील आरक्षण पुर्ववत करा, अन्यथा सत्ता सोडा, ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवा अशा मागण्यांसह भाजपाचे आज राज्यभर ठाकरे सरकारविरोधात चक्काजाम आंदोलन सुरू आहे. राज्यात मुंबई, औरंगाबाद, ठाणे, पुणे, बीड, नागपूर, चंद्रपूर, नाशिक अशाविविध ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते आणि ओबीसी नेते रस्त्यावर उतरले आहेत.


मुंबईत आशिष शेलार आणि मनोज कोटक यांच्या नेतृत्वाखाली मुलुंड टोलनाक्याजवळ भाजपनं चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे. ओबीसी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त राज्यात ठिकठिकाणी करण्यात आला आहे. आशिष शेलार आणि भाजप कार्यकर्त्यांनी मुलुंड टोलनाक्याजवळ रस्त्यावरच ठिय्या देत ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली आहे.

औरंगाबादेत कार्यकर्त्यांची धरपकड

औरंगाबाद भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत विश्वशंकर मंगल कार्यालायत कार्यकर्त्यांना ठेवले परंतु ताब्यात घेतल्यानंतरही भाजपचे आंदोलन आ. अतुल सावे , संजय केणेकर यांच्या नेतृत्वाखाली सुरूच होते. दरम्यान पुण्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होत आहे. तर परळीत प्रीतम मुंडे आंदोलनाचं नेतृत्व करीत आहेत. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपाने जेलभरो आंदोलन आज केले आहे. यात १ लाख लोकांचे जेलभरो आंदोलनाचा पवित्रा भाजपने घेतला आहे.

“ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. त्यामुळे आज भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांना अटक झाली तरी चालेल. पण या नाकर्त्या सरकारला जाग यायला हवी. जोवर ओबीसींचं राजकीय आरक्षण पूर्ववत होत नाही तोवर आमची भूमिका अशीच दिवसेंदिवस तीव्र करू”, असे आशिष शेलार म्हणाले. दुसरीकडे मंत्रालय परिसरात देखील भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला आहे. या मोर्चात भाजपचे नेते गिरीष महाजन सहभागी झाले आहेत. ओबीसी समाजामध्ये आज प्रचंड रोष आहे. सरकारमध्ये कोणतीही एकवाक्यता नसल्यामुळे ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झालंय, असं गिरीष महाजन म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!