Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : राज्यात ८ हजार ४७० नवीन कोरोनाबाधित तर ९ हजार ४३ रूग्ण कोरोनातून मुक्त

Spread the love

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून  कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असून दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्यांची  रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.गेल्या २४ तासात  राज्यात ९ हजार ४३ रूग्ण कोरोनातून बरे झाले असून, ८ हजार ४७० नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. याशिवाय, आज राज्यात १८८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.


राज्यात आजपर्यंत एकूण ५७,४२,२५८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.९ टक्के एवढे झाले आहे.

औरंगाबाद कोरोना स्थिती
आजचे रुग्ण : 77
डिस्चार्ज : 121
मृत्यू : 8
एकूण सक्रिय रुग्ण : 941

सध्या राज्यातील मृत्यूदर १.९८ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,९८,८६,५५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,८७,५२१ (१५.०१टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,५८,८६३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,१९६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १,२३,३४० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान राज्यात आजपासून १८ वर्षांवरील नागरिकांना करोना प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात झाली. तसेच, राज्यात आज ५ लाख ५२ हजार ९०९ जणांना लसीकरण करून आतापर्यंतचा उच्चांक नोंदविण्यात आला आहे. यापूर्वी २६ एप्रिल रोजी एकाच दिवशी ५ लाख ३४ हजार नागरिकांना लस देण्यात आली होती, अशी देखील डॉ. व्यास यांनी माहिती दिली आहे. आरोग्य यंत्रणेच्या या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी समाधान व्यक्त करतानाच आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले आहे. आतापर्यंत सुमारे २ कोटी ८५ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. आज दिवसभरात ५ लाख ५२ हजार नागरिकांचे लसीकरण झाले. रात्री ८ वाजेपर्यंतची ही आकडेवारी असून त्यात अजून वाढ होऊ शकते, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!