Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगा दिनाच्या निमित्ताने देशवासियांना केले संबोधित

Spread the love

नवी दिल्ली : योगाने लोकांमध्ये करोनाशी लढण्याचा विश्वास निर्माण केला असे  सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी करोना संकटात योगाचे  महत्व सांगितले. योगामुळे निरोगी आयुष्य, सामर्थ्य आणि सुखी जीवन मिळते  असेही यावेळी त्यांनी सांगितले. सुखी आयुष्यासाठी योगा महत्वाचा असल्याचं नरेंद्र मोदींनी म्हटले  आहे.

“आज जेव्हा संपूर्ण जग करोनाशी लढत आहे तेव्हा योगा लोकांसाठी आशेचा किरण ठरत आहे. भारतात कोणताही मोठा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला नसला तरी योगा दिनाचा उत्साह कमी झालेला नाही. करोना असतानाही योगा दिवसाची थीम ‘योगा फॉर वेलनेस’ने करोडो लोकांमध्ये योगाप्रती उत्साह वाढवला आहे,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.

दरम्यान राहुल गांधी यांनी ट्विटरवरून, “हा योगा दिन आहे, योगा दिवसाच्या नावाखाली लपण्याचा दिवस नव्हे.” असे ट्विट करून यावेळी मोदींचा उल्लेख न करता टीका केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!