Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : देशात ५३ हजार २५६ नव्या रुग्णांची नोंद

Spread the love

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात रविवारी ५३ हजार २५६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या देशाचा रिकव्हरी रेट वाढून ९६.३६ टक्क्यांवर पोहचला आहे. तर दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट ३.८३ टक्के आहे.

दरम्यान, गेल्या २४ तासांत करोनामुळे १४२२ जणांचा मृत्यू नोंदविण्यात आला असून ७८ हजार १९० रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ९९ लाख ३५ हजार २२१ वर पोहचलीय. देशात आत्तापर्यंत २ कोटी ८८ लाख ४४ हजार १९९ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. तर सध्या ७ लाख ०२ हजार ८८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर देशातील मृतांची एकूण संख्या ३ लाख ८८ हजार १३५ वर पोहचली आहे.

एक नजर

एकूण कोरोनाबाधित : २ कोटी ९९ लाख ३५ हजार २२१
एकूण बरे झालेले रुग्ण : २ कोटी ८८ लाख ४४ हजार १९९
सक्रिय रुग्ण : ७ लाख ०२ हजार ८८७
एकूण मृत्यू : ३ लाख ८८ हजार १३५
एकूण लसीकरण : २८ कोटी ०० लाख ३६ हजार ८९८

आपलं सरकार

Click to listen highlighted text!