IndiaNewsUpdate : भारतीय जहाज P-305 समुद्रात बुडाले , 146 लोकांना वाचवण्यात यश, 170 पेक्षा अधिक लोक बेपत्ता

मुंबई : मुंबईच्या समुद्री भागात 175 किलोमिटर दूर अंतरावर हीरा ऑयल फील्ड्सजवळ अडकलेले एक भारतीय जहाज P-305 समुद्रात बुडाले असल्याचे वृत्त आहे. भारतीय नौदलाला खवळलेल्या समुद्रातून 146 लोकांना सुखरूप वाचवण्यात यश असले तरी अजूनही 170 पेक्षा जास्त लोक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे खवळलेल्या समुद्रात याच भागात आणखी एक जहाज अडकले आहे. या जहाजावर अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी INS कोलकाताला पाठवले आहे. या जहाजावर 137 लोकं अडकलेली आहे. त्यापैकी 38 जणांना सुखरुप बाहेर काढले आहे.
दरम्यान ‘तोत्के’ चक्रिवादळ शांत झाले असले तरी खोल समुद्रात मात्र अजूनही वातावरण प्रचंड प्रतिकूल आहे. परिणामी समुद्राला उधाण आले आहे. भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाला गेल्या दोन दिवसात खोल समुद्रात अडकेलेल्या जहाजांवरून चार SOS चे कॅाल आलेत. त्यामुळे भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाचे मोथे रेस्क्यू ॲापरेशन सध्या अरबी समुद्रात सुरू आहे. भारतीय नौदलाने मुंबईच्या नौदल एअर बेस INS शिक्रा येथून सी किंग हेलीकॅाप्टर बचाव कार्यासाठी पाठवले आहे.
उपलब्ध माहितीनुसार बार्ज P305 या प्रवासी जहाजावर २७३ प्रवासी आणि खलासी अडकले असून त्यापैकी १४६ प्रवाश्यांना भारतीय नौदलाच्या INS कोची आणि INS कोलकाता या युद्धनौकांनी वाचवून सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. त्यानंतर गल कस्ट्रक्ट्रर या जहाजावर १३७ प्रवासी होते. या जहाजावरील प्रवाश्यांना वाचवण्यासाठी तटरक्षक दलाने टोईंग बोट वाटर लिली आणि CGS सम्राट घटनास्थळी पाठवली आहे. त्यांचे तिथे बचाव कार्य सुरू आहे. या शिवाय ॲायल रिंग सागर भूषण प्रकल्पावर १०१ कर्मचारी अडकले असून या सर्व कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी नौदलाने INS तलवार युद्धनौकेला कालच पाठवले होतं. पण उधाणलेल्या समुद्रामुळे त्यांना बचाव कार्यात मोठा अडथळा येत आहे. त्यांचे बचाव कार्य अद्याप सुरूच आहे. तसेच बार्ज SS-3 या प्रवासी जहाजावर १९६ प्रवासी अडकले असून त्यांना वाचवण्यासाठी भारतीय नौदल हेलीकॅाप्टर पाठवत असल्याची माहिती आहे.