Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : साथरोगतज्ज्ञ शाहीद जामील वैज्ञानिक सल्लागार प्रमुख पदाचा राजीनामा

Spread the love

नवी दिल्ली : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या सार्स-कोव्ही-२ जीनोमीत कॉनसर्टीयाच्या (आयएसएसीओजी) प्रमुख पदावरुन साथरोगतज्ज्ञ शाहीद जामील यांनी  राजीनामा दिला आहे. भारतामधील करोना विषाणूंच्या जीनोम सिक्वेन्सिंग म्हणजेच रचनेसंदर्भात सरकारला सल्ला देण्यासाठी काही वैज्ञानिकांचा समावेश असणारा हा गट स्थापन करण्यात आला होता. जामील हे या गटाचे प्रमुख होते. मात्र मध्यरात्रीच्या सुमारस त्यांनी हे पद सोडत असल्याचे  सांगितले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यात, कमी करण्यात केंद्र सरकार कमी पडल्याची टीका जामील यांनी अनेकदा केली आहे.

जामील यांनी अशाप्रकार तडकाफडकी राजीनामा देणे हा सरकारसाठी मोठा झटका असल्याचे  मानले  जात आहे. अनेक विषयांवरुन जामील यांची मत ही सरकारच्या सध्याच्या धोरणांपेक्षा वेगळी होती तसेच ते या गटाचे प्रमुख असेल तरी सरकारच्या धोरणांवर सडेतोड शब्दांमध्ये टीका करत असल्याचे  मागील काही काळापासून दिसून येत होते .

देशामध्ये करोना विषाणूचे अनेक प्रकार आढळून आल्यानंतर जानेवारीमध्ये आयएसएसीओजीची स्थापना करण्यात आलेली. विषाणूमध्ये होणारा बदल आणि त्यासंदर्भातील सल्ला केंद्राला देण्यासाठी वैज्ञानिकांच्या या गटाची स्थापना करण्यात आली होती. यामध्ये देशभरातील वेगवेगळ्या भागातून विषाणूंची रचना समजून घेण्यासाठी सॅम्पल गोळा करुन दहा प्रयोगशाळांमध्ये त्यांच्यावर अभ्यास केला जायचा. जानेवारीत हा गट स्थापन करण्यात आला तेव्हा त्याला सहा महिन्यांची मुदत देण्यात आलेली नंतर वाढवण्यात आली. भारतामधील जिनोम रचना अभ्यास आणि संशोधनाच्या कामाने आयएसएसीओजीच्या स्थापनेनंतर बरीच गती पकडली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!