Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaNewsUpdate : दिलासादायक : देशात आणि राज्यात कोरोनमुक्त रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ

Spread the love

नवी दिल्ली :  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने  दिलेल्या माहितीनुसार, देशात रविवारी (१६ मे २०२१) २ लाख ८१ हजार ३८६ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर याच २४ तासांत तब्बल ३ लाख ७८ हजार ७४१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. एका दिवसात ४१०९ रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत.

देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ४९ लाख ६५ हजार ४६३ वर पोहचली आहे. तर आतापर्यंत देशात एकूण २ लाख ७४ हजार ३९० नागरिकांचा  कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र, देशात आत्तापर्यंत २ कोटी ११ लाख ७४ हजार ०७६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात सध्या  सक्रिय रुग्णांची संख्या ३५ लाख १६ हजार ९९७ असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

एक नजर 

एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : २ कोटी ४९ लाख ६५ हजार ४६३

एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : २ कोटी ११ लाख ७४ हजार ०७६

उपचार सुरू : ३५ लाख १६ हजार ९९७

एकूण मृत्यू : २ लाख ७४ हजार ३९०

करोना लसीचे डोस दिले गेले : १८ कोटी २९ लाख २६ हजार ४६०

देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान आतापर्यंत एकूण १८ कोटी २९ लाख २६ हजार ४६० लसीचे डोस देण्यात आले आहेत. यातील ६ लाख ९१ हजार २११ लसीचे डोस रविवारी देण्यात आले. दरम्यान भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने  (ICMR)दिलेल्या माहितीनुसार, १६ मे २०२१ पर्यंत देशात एकूण ३१ कोटी ६४ लाख २३ हजार ६५८ नमुन्यांची तपासणी करण्यात आलीय. यातील १५ लाख ७३ हजार ५१५ नमुन्यांची करोना चाचणी कालच्या एकाच दिवसात अर्थात रविवारी करण्यात आली.

राज्यात कोरोनमुक्त रुग्णांच्या संख्ये वाढ 

मुंबई : गेल्या २४ तासात राज्यात तब्बल 59 हजार 318 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर 34 हजार 389 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. दरम्यान आज 974 कोरोना रुग्णांची मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आजपर्यंत 48,26,371 कोरोना रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 4 लाख 68 हजार 109 सक्रीय रुग्ण आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!