Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PuneNewsUpdate : राजीव सातव कोरोनमुक्त होताच न्यूमोनियाचा संसर्ग

Spread the love

पुणे : काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आणि गुजरातचे प्रभारी राजीव सातव यांनी पाच दिवसांपूर्वीच कोरोनावर मात केली होती. पण, आज त्यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली असून न्युमोनियाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गटातून चिंता व्यक्त केली जात आहे. राजीव सातव यांची प्रकृती खालावल्याचे वृत्त हाती आल्यानंतर काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलकडे धाव घेतली आहे. राजीव सातव यांच्यावर जहांगीर हॉस्पिटलमध्ये गेल्या 22 दिवसांपासून उपचार सुरू आहे. राज्यातील अनेक बिकट परिस्थितीत त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

दरम्यान काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आज जहांगीर रुग्णालयात जाऊन थोरात यांचा प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर बोलताना थोरात म्हणाले ,”माझी आत्ता डॉक्टरांशी चर्चा झाली नाही. मात्र वर्षा गायकवाड या इथेच आहेत. त्यांची डॉक्टरांशी चर्चा झालेली आहे. सातव नॉर्मल वर येत होते. पुन्हा थोडा त्रास झालेला आहे.पण ते लवकरच बरे होतील ”

19 एप्रिल ला सातव यांना कोरोना ची लक्षणे जाणवली होती त्यानंतर 23 तारखेपासून ते पुण्यात उपचार घेत आहेत. त्यांना व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले होते. त्यांची तब्येत सुधारत असतानाच काल सातव यांना त्रास झाला. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या कालपासून मुक्कामी थांबल्या आहेत. तर रजनी सातव आज सकाळी पोचल्या आहेत. थोरात यांची भेट झाल्या नंतर त्यांनी सातव यांचे शरीर उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!