Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : मराठवाडा , मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता

Spread the love

मुंबई  : भारतीय वेधशाळेने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे ढग दाटले आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार तासात राज्यात पुण्यासह अहमदनगर, सांगली, सातारा, हिंगोली, बीड, परभणी आणि उस्मानाबाद या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडासह, वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाच्या दरम्यान वीज कोसळून मोठी जीवितहानी  झाली आहे. काल औराद याठिकाणी वीज कोसळल्याने  तब्बल 15 जनावरे  जळून खाक झाली आहेत. तर अतनूर याठिकाणीही एका बैलाचा मृत्यू झाला आहे. मागील आठवड्यात वीज कोसळल्याने  वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता.

सध्या राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांच्या नुकसानासोबतचे  जीवितहानी  होण्याचे  प्रमाणही  वाढले  आहे. त्यामुळे पाऊस पडत असताना किंवा वीजा चमकत असताना मोकळ्या जागेत येऊ नये, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.  त्यामुळे पुढील आणखी चार दिवस राज्यासह संपूर्ण देशात अनेक ठिकाणी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. आज विदर्भासहित दक्षिण मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तर तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!