Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsCurrentUpdate : छोटा राजनचा मृत्यू झाल्याचा एम्स आणि दिल्ली पोलिसांकडून इन्कार

Spread the love

नवी दिल्ली : तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेला कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा करोनामुळे मृत्यू झाल्याची बातमी आकाशवाणीने दिली आहे. मात्र एएनआय या वृत्तसंस्थेने छोटा राजन हा जिवंत असल्याचे वृत्त दिले आहे. नवी दिल्लीमधील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सर्व्हिसेस म्हणजेच एम्समध्ये उपचारादरम्यान राजनवर उपचार सुरु आहेत. आकाशवाणीने हे वृत्त देताच शुक्रवारी राजनाचा मृत्यू झाल्याची बातमी प्रसारमाध्यमांनी दिली होती. मात्र काही वेळातच एएनआयने एम्समधील सुत्रांच्या हवाल्याने राजन जिवंत असल्याचे  म्हटले आहे.

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्या तिहारच्या तुरुंगामध्येच राजनला कोरोनाची लागण झाली. त्याच्यावर सुरुवातीला तुरुंगातील रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे तुरुंग प्रशासनाकडून सांगण्यात आले  होते . मात्र लक्षणे  दिसल्यानंतर छोटा राजनची कोरोना चाचणी करण्यात आली आणि तो पॉझिटिव्ह आढळून आला. यासंदर्भातील माहिती तुरुंग प्रशासनाकडून देण्यात आली होती. राजन पॉझिटिव्ह आल्यानंतर तिथे तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांना होम क्वारंटाईन होण्यास सांगण्यात आले . मात्र उपचारादरम्यान राजनची प्रकृती खालावल्याने त्याला एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. २६ एप्रिलपासून राजनवर एम्समध्ये उपचार सुरु आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!