Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : ममता बॅनर्जी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

Spread the love

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी सलग तिसऱ्यांदा  शपथ घेतली.  विधानसभा निवडणुकीत तृणमूल कांग्रेसने दणदणीत विजय मिळवला. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा शपथविधी सोहळा मर्यादित लोकांच्या उपस्थितीत पार पडला . मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आपले  प्राधान्य करोनाविरुद्धचा लढा हेच असेल असे सांगत त्यांनी लोकांना शांतता राखण्याचंही आवाहन केले.

या शपथविधी सोहळ्यासाठी ममता यांनी पांढरी साडी आणि शाल परिधान केली होती. त्यांनी बंगाली भाषेत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ममता बॅनर्जी या देशातील एकमेव मुख्यमंत्री  आहेत. बाकीचे सर्व मंत्री ९ मे रोजी रविंद्रनाथ टागोर यांच्या जयंतीदिवशी शपथ घेतील. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

या शपथविधीनंतर राज्यपाल धनकर यांनी ममता यांचं अभिनंदन केले  आणि सध्या चाललेला हिंसाचार थांबवून पुन्हा एकदा शांतता व सुव्यवस्था स्थापन करण्यास सांगितले आहे.  गेल्या दोन दिवसांत पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारात १४ जणांचा मृत्यू झाल्याचे  सांगितले  जात आहे. ममता यांनी लवकरात लवकर हा हिंसाचार थांबवण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

दरम्यान, भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी ममता बॅनर्जी यांच्या शपथविधी सोहळ्यावर टीका करताना म्हटले आहे कि ,  “ते शपथ घेऊ शकतात. प्रत्येकाला लोकशाहीने हा अधिकार दिलेला आहे. पण आम्हीही ही शपथ घेतो की आम्ही बंगालमधल्या राजकीय हिंसाचाराचा नायनाट करु”.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!