Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

GoodNews : दोन महिन्याच्या कोरोनाबाधित बळावर यशस्वी कार्डियाक सर्जरी !!

good news, hands holding paper with text concept, positive media

Spread the love

मुंबई :  कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे  सर्वत्र निराशाजनक वातावरण निर्माण झालेले असताना  एका दोन महिन्यांच्या बालकाने हृदयविकारासोबतच कोरोनावरही मात केल्याचे  दिलासादायक वृत्त आहे. कार्डियाक सर्जरीसारख्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर बाळाच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

या ईषयीची अधिक माहिती अशी कि , नंदुरबार येथील रहिवासी असणाऱ्या कृष्णा अगरवाल यांच्या एक महिन्याच्या मुलीच्या हृदयात गंभीर बिघाड असल्याचे  निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्यांनी बाळावर पुढील उपचार करण्यासाठी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण याठिकाणी शस्त्रक्रिया करण्याची सर्व तयारी केली जात असताना, बाळाला कोविडची बाधा असल्याचे  आरटी पीसीआर चाचणीतून समोर आले. हे  समजताच अगरवाल परिवाराच्या चिंता वाढल्या होत्या. पण या लढाऊ बाळाने दोन्ही आजारांवर मात केली आहे.

या दोन्ही गंभीर आजारांमुळे तिची ऑक्सिजनची पातळी 86 टक्क्यांपर्यंत खालावली होती. पण पंधरा दिवसांत तिने कोरोनावर मात केली. त्यानंतर बाळावर हृदयविकारासंबंधित कार्डियाक सर्जरी केली. बराच काळ अखंड चाललेल्या शस्रक्रियेला बाळाने चांगला प्रतिसाद दिला असून सध्या बाळाच्या प्रकृतीत सुधारणा होतं आहेत. विशेष म्हणजे बाळाची आई देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने  त्यांनाही आयसोलेट करण्यात आले  होते . तर बाळाच्या प्रकृती काही बिघाड झाल्यात तातडीने  सर्जरी करण्यासाठी डॉक्टरांची एक टीम सज्ज ठेवण्यात आली होती. पण सुदैवानं बाळाला काहीही झाले नाही.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!