Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraElectionUpdate : पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत ६८ टक्के मतदान

Spread the love

सोलापूर: पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. त्यात अंदाजे ६८ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली आहे. कोरोनाच्या प्रभावाखाली झालेल्या मतदान प्रक्रियेत सकाळपासून मतदानाचा वेग मंद होता. मात्र तो दुपारनंतर वाढत गेला. सायंकाळी काही गावांत त्यात आणखी उत्साही वाढ झाली.
दरम्यान राज्यात चर्चेत राहिलेल्या या उत्साही मतदानाचा कौल कुणाला मिळणार हे येत्या २ मे रोजी लागणाऱ्या निकालातून स्पष्ट होणार आहे. या निवडणूकीच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीत सर्वपक्षीय १९ उमेदवार रिंगणात असले तरी तुल्यबळ लढत ही राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके आणि भारतीय जनता पक्षाचे समाधान आवताडे अशीच झाली. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळं रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची ही पोटनिवडणूक लागली होती. राज्यात अन्यत्र कुठेच निवडणूका नसल्याने विधानसभेची ही पोटनिवडणूक महाविकासआघाडी सरकारमधील नेत्यांनी आणि राज्यात विरोधक असलेल्या भाजपने प्रतिष्ठेची केली होती. याचे कारण म्हणजे, राज्यात बेरजेचे राजकारण करत अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतरची ही पहिलीच निवडणूक होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!