Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : एमआयएम आणि भाजपाने पोलिसांचे मानसिक खच्चीकरण करु नये :  आ. अंबादास दानवे

Spread the love

औरंगाबाद – एमआयएमचे खासदार आणि भाजपा मिळून पोलिसांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करंत आहेत. ते त्यांनी थांबवावे अन्यथा शिवसेना त्यांना चोख प्रत्यूत्तर देईल असे शिवसेना प्रवक्ते आ. अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले. शहरामधे सत्ताधारी पक्षाचे तीन आमदार असतांना फिरोजखान मृत्यू प्रकरणी शिवसेनेनी बघ्याची भूमिका घेतली का ? या प्रश्नावर आ.दानवे बोलत होते.

काल बुधवारी दुपारी १२.३० ते १च्या सुमारास पीरबाजारातील सलून चालक व मालक फिरोजखान हे त्यांच्या दुकानाजवळ चक्कर येऊन पडले.व त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या वेळी उस्मानपुरा पोलिस घटनास्थळापासून बरेच दूर होते. ही घटना सी.सी.टि.व्ही मधे कैद झाली आहे. असे असतांना काही नागरिकांनी फिरोजखान यांचा मृतदेह उस्मानपुरा पोलिस ठाण्यात नेत पोलिसांच्या मारहाणीमुळे फिरोजखान यांचा मृत्यू झाल्याचे कारण पुढे करत दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसआयुक्त डाॅ. निखील गुप्ता यांनी उस्मानपुरा परिसरात येत परिस्थिती संयमाने हाताळली. परिस्थितीवर नियंत्रण मिळवत दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची घोषणा केली. पोलिसांचे हे मानसिक खच्चीकरण करण्याचे उद्योग एमआयएम भाजपाने थांबवावे असे शेवटी आ.दानवे म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!