MaharashtraNewsUpdate : राज्यात औरंगाबाद फॉर्म्युला ५ दिवस कडक निर्बंध : शनिवार, रविवार लॉकडाऊन

मुंबई : कोरोनाचा वाढत संसर्ग थांबवण्यासाठी चार दिवसाच्या चर्चेच्या गुऱ्हाळनंतर राज्य सरकारने लॉकडाऊनच्या औरंगाबाद फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब केले आहे . या आदेशानुसार सोमवार ते शुक्रवार रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत संचारबंदी आणि दिवसभर कडक निर्बंध लावले आहेत तर शनिवार , रविवार दोन दिवस लॉकडाऊनची घोषणा केली आहे . 30 एप्रिलपर्यंत हे आदेश लागू राहतील.
राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठकीत लॉकडाऊन लागू करण्याबाबत चर्चा झाली. या बैठकीमध्ये कडक निर्बंध लावावे का असा मुद्दा कॅबिनेट मंत्र्यांनी उपस्थितीत केला होता. त्यानुसार राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत . मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबद्दल सर्वच मंत्र्यांनी लॉकडाऊन न लागू करण्याचा सूर लगावला होता त्यामुळे उद्या मध्यरात्रीपासून कडक निर्बंधाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
औरंगाबाद शहरात शुक्रवारी रात्री ते सोमवार सकाळपर्यंत पूर्णपणे संचारबंदी लागू असते. त्याच धर्तीवर राज्यात लॉकडाऊन केला जात आहे. त्यामुळे राज्यात शनिवारी आणि रविवारी कडक लॉकडाऊन असणार आहे. रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत कडक संचारबंदी असणार आहे.
काय आहे नेमका निर्णय ?
– रात्री 8 ते 7 या वेळेत नाईट कर्फ्यू लावला . केवळ आवश्यक सेवांना परवानगी . रेस्टॉरंट्सना फक्त टेक टू आणि पार्सल होम डिलिव्हरीसेवांसाठी परवानगी. कार्यालयांसाठी कर्मचार्यांना वर्क फ्रॉम होम. रात्रीच्या निर्बंधा दरम्यान, केवळ आवश्यक सेवांना परवानगी. नाट्यगृहे, उद्याने, क्रीडांगणे बंद . शासकीय कार्यालये 50% क्षमतेने कार्यरत. बांधकाम, औद्योगिक क्रियाकलाप आणि बाजारपेठा कार्य करण्यास अनुमती. गृहनिर्माण क्षेत्रातील सर्व कामे सुरूराहतील. मास्क न घातल्यास 500 रुपये दंड
काय बंद राहणार?
बार, हॉटेल, मॉल्स बंद राहणार . नाट्यगृह, सिनेमागृह बंद. अत्यावश्यक सेवा सोडून रात्री 8 ते सकाळी 6 पर्यंत सगळं बंद. शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत राज्यात संपूर्ण लॉकडाऊन. लोकलमध्ये आसनक्षमतेनुसार प्रवास करता येणार. रिक्षामध्ये फक्त दोन प्रवाशांना परवानगी. बसमध्ये आसनक्षमतेनुसार प्रवाशांना परवानगी. राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी. धार्मिक स्थळावर बंधन.