Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : ‘SSMS’ नावाचे अॅपमुळे औरंगाबाद पोलिसांच्या गस्ती झाल्या डिजीटल !!

Spread the love

औरंगाबाद – जिओमॅपींगची आणि पाॅपअप ची सुविधा क्लाऊडबेस असलेले एसएसएमएस नावाचे अॅप पोलिसआयुक्त डाॅ.निखील गुप्ता यांनी गस्त घालणार्‍या पोलिसांसाठी घेतले आहे.त्याची ट्रेनिंग पूर्ण झाली असून प्रॅक्टीकल सुरु आहेत.

यापूर्वी पोलिस गस्त करत असतांना शहरात गस्तीच्या मार्गावर रजिस्टर ठेवलेले असायचे व गस्त करणारे पोलिस अधिकारी , कर्मचारी त्या ठिकाणी जाऊन सही करायचे ती सही पोलिस निरीक्षक व्हेरीफाय करुन मग पोलिसआयुक्तांना रिपोर्ट करायचे या सगळ्या प्रथा संपुष्टात आणून SSMS या अॅपचा वापर सुरु करुन पोलिसआयुक्तांनी नवी सुविधा आपल्या सहकार्‍यांना उपलब्ध करुन दिली. आता यामधे गस्तीवर असलेल्या पोलिसांना एकदाच दोन चार दिवसाच्या सह्या करुन टाकता येत नाही. तर ज्यावेळी ज्या ठिकाणी गस्तीवर असाल त्या ठिकाणाहून सेल्फी किंवा क्यूआर कोड एकावेळी एकदाच काढून पाठवता येतो. तसेच गस्तीवर असतांना काही इमर्जन्सी उदभवली तर धौक्याचा पाॅपअप मेसैज संबंधित पोलिस ठाण्याला जातो. या अॅपला प्सत्येक पोलिस ठाण्यासाठी वेगळा लाॅगिन आयडी पासवर्ड असतो.कोणतेही पोलिस ठाणे कोणत्याही पोलिस ठाण्याची गस्त आपल्या मोबाईल किंवा पीसी वर बघू शकंत नाहीत.पण पोलिसआयुक्त सगळ्या पोलिस ठाण्यांच्या २४तास सुरु असलेल्या गस्तीवर या अॅपच्या माध्यमातून लक्ष ठेवू शकतात.
पुणे बेस्ड दिनकर साॅफ्टवेअर सोल्यूशन या साॅफ्टवेअर कंपनीने हे अॅप तयार केले आहे. या कंपनीचे शहरात उस्शानपुर्‍यात कार्यालय आहे. हर्षद बोरावके हे औरंगाबाद विभागाचे या कंपनीचे प्रमुख आहेत.

वरील अॅप हे बोरावके यांनी सर्वस्वच्छ अभियानासाठी चंद्रपूर आणि वर्धा महापालिकांसाठी तयार करुन दिले होते.कचर्‍याच्या गाड्या सकाळी वेळेवर प्रत्येक ठिकाणी जाऊन कचरा गोळा करतात ही प्रक्रिया या अॅपद्वारे पूर्ण केली जात होती. पण या अॅपचा वापर पोलिसांच्या पेट्रोलिंग साठी का नाही होऊ शकंत असा विचार बोरावके यांनी केला व दीड महिन्यांपूर्वी पोलिसआयुक्त डाॅ.गुप्ता यांची भेट घेऊन त्यांना कल्पना दिली. डाॅ.गुप्ता यांनाही हे अॅप उपयुक्त आहे असा विश्र्वास वाटला पण त्यांनी बोरावके यांच्याकडे शंका उपस्थित केली की, अॅप लाॅंच करुन दिल्यावर साॅफ्टवेअर कंपन्या सर्विस देत नाही ? सर्विस बद्दल बोरावके यांनी खात्री देताच पोलिसआयुक्तालयात SSMS अॅक्टीव झाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!