Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : ‘टीएमसी’ म्हणजे ‘टाका मार कंपनी’ मोदींनी उडवली ममता बॅनर्जी यांची खिल्ली

Advertisements
Advertisements
Spread the love

कोलकाता :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  मुख्यमंत्री ममता बॅनर्जी  यांच्यावर  बंगालच्या सोनारपूरमध्ये झालेल्या भाजपाच्या प्रचारसभेत बोलताना अत्यंत खोचक टीका केली आहे. ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी ची खिल्ली उडवताना त्यांनी टीएमसीचा उल्लेख  ‘टाका मार कंपनी’ असा करून  “ममता दीदी तुम्ही बंगालच्या नागरिकांवर विश्वास ठेवायला हवा. बंगालच्या लोकांनी त्यांचा कौल दिला आहे. त्यांचा निर्णय झालाय की तुम्हाला तुमची टाका मार कंपनी (टीएमसी) घेऊन इथून निघून जावे  लागेल” अशी टीका केली आहे.

Advertisements

पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात पुढे म्हणाले कि ,  ममता बॅनर्जींना नंदीग्राममधून निवडणूक लढवण्याचा पश्चात्ताप होतो आहे. तृणमूल काँग्रेसमधले लोकं सांगतात की ममता बॅनर्जींनी रागात नंदीग्राममधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. पण त्यांनी ही सर्वात मोठी चूक केली आहे.

Advertisements
Advertisements

दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या वाराणसीविषयीच्या विधानाचा देखील त्यांनी यावेळी समाचार घेतला.  ममता बॅनर्जी यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये जाण्याचे  आव्हान दिले  आहे. त्यावर बोलताना मोदी म्हणाले, “वाराणसीमध्ये ममता बॅनर्जींना मोठ्या मनाचे, टिळा लावलेले आणि शेंडी असलेले लोकं भेटतील. त्याची त्यांना अडचण होईल. इथे त्यांना जय श्रीराम घोषणेचा राग येतो, तिथे त्यांना हर हर महादेव देखील ऐकायला मिळेल”, असेही  मोदी म्हणाले .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!