Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCoronaUpdate : कोरोबाधितांच्या आणि मृतांच्या संख्येत मोठी वाढ ३९ हजार ५४४ नवे रुग्ण , २२७ मृत्यू

Spread the love

औरंगाबाद कोरोना अपडेट


नवीन रुग्ण :1542 एकूण रुग्ण : 82679
डिस्चार्ज : 1220. एकूण : 65438
आजचे मृत्यू : 19 एकूण : 1670
सक्रिय रुग्णांची संख्या : 15571


मुंबई । राज्यात गेल्या २४ तासांत ३९ हजार ५४४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर, २२७ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी २७ हजार ९१८ रुग्णांचे निदान झाल्यानंतर राज्याला काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. मात्र, आज पुन्हा एकदा बाधितांची संख्या वाढली आहे. त्याचबरोबर करोना मृतांचा आकडाही आज वाढला आहे. नवीन बाधित, अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडाही वाढत असल्यानं आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे.


राज्यात आज करोनानं आणखी २२७ रुग्ण दगावले असून एकूण मृतांचा आकडा ५४ हजार ६४९ इतका झाला आहे. तर, राज्यातील मृत्यूदर १. ९४ इतका आहे. राज्यात सध्या ३ लाख ५६ हजार २४३ अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत असून राज्यातील विविध रुग्णालयांत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९७,९२,१४३ प्रयोगशाळा नमनुयाांपैकी २८,१२,९८० (१४.२१टक्के) नमनु पॉझिटिव्ह आले आहेत.

गेल्या २४ तासांत एकूण २३ हजार ६०० रुग्ण बरे झाले आहेत. तर, आत्तापर्यंत एकूण २४ लाख ७२७ जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळं राज्यातील रिकव्हरी रेट ८५. ३४ टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात १७,२९,८१६ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत तर १७,८६३ व्यक्ती संस्थातमक क्वारांटाईनमध्ये आहेत.

आज मुंबईत ५ हजार ३९४ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर, १५ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत ५१ हजार ४११ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, आज ३ हजार १३० जणांनी करोनावर मात केली आहे.

कोरोना चाचण्यांचे दर कमी


दरम्यान, राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या करोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले असून आता करोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी ५०० रुपये आकारण्यात येणार आहे. याबरोबरच रॅपीड अँटीजेन अँटीबॉडीज तपासणीचे दर देखील कमी करण्यात आले असून अँटीजेन टेस्ट १५० रुपये करण्यात येणार आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने शासन निर्णय देखील जाहीर केला आहे.


 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!