Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PuneNewsUpdate : प्रसिद्ध साहित्यिक विलास वाघ यांचे निधन

Spread the love

पुणे :  फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील साहित्याचे  प्रकाशक , संपादक , लेखक , विचारवंत , व्याख्याते , आंतरजातीय धर्मीय विवाह चळवळीचे पुरस्कर्ते  प्रा. विलास वाघ यांचे गुरुवारी पहाटे 6 वाजताच्या सुमारास कोरोनामुळे निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. सुगावा प्रकाशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रबोधनात्मक परिवर्तनवादी साहित्याची निर्मिती केली. विविध  पुरोगामी संस्था-संघटना यांच्याशी त्यांचा निकटचा संबंध होता.

प्रा. विलास वाघ यांच्या जीवन प्रवासावर एक नजर –

– 1 मार्च 1939 रोजी जन्म : मोराने तालुका जिल्हा धुळे

– पहिली ते चौथी प्राथमिक शिक्षण मोराणे

– पाचवी ते अकरावी माध्यमिक शिक्षण धुळे येथील गरुड विद्यालय

–  जून 1958 एसएससी परीक्षा पास

–  1958 ते 1962 पुण्यातील एसपी महाविद्यालयातून बी एस सी उत्तीर्ण

–  जून 1962 कोकणातील नरडवणे गावात शिक्षकाची नोकरी

–  1964 ते 1980 पुण्यातील अशोक विद्यालयात शिक्षकाची नोकरी

–  1972 :  सुगावा प्रकाशनाची सुरुवात ते आजतागायत सुरू

–  1981 बीएड उत्तीर्ण

–  1983 : उषा ताई वाघ याच्याशी आंतरजातीय विवाह: सरांच्या अनेक कामामध्ये ताईंचा पुढाकार

–  1981 ते 86 पुणे विद्यापीठातील प्रौढ निरंतर शिक्षण विभागात रीडर म्हणून काम केले

–  1986 पुणे विद्यापीठातील नोकरीचा राजीनामा

–  1964-1980 या काळात वडारवाडीत बालवाडी सुरू केली. सर्वेषा सेवा संघामार्फत देवदासींच्या मुला मुलींसाठी पहिले वसतिगृह सुरू केले. राष्ट्र सेवा दलाच्या शिक्षण प्रसारक मंडळाचे एक वर्ष अध्यक्ष.

–  1972 समता शिक्षण संस्थेची स्थापना या संस्थेमार्फत महिलाश्रम वसतिगृह तळेगाव येथे सुरू केले. कस्तुरबा मुलींचे वस्तीग्रह तळेगाव ढमढेरे येथे सुरू केले. समता मुलांचे वस्तीगृह तळेगाव येथे सुरू केले. 1978 भटक्या विमुक्त जमातीच्या मुला-मुलींसाठी तळेगाव येथे आश्रम शाळा सुरू केली. 1989  मोराणे येथे भटक्या विमुक्त जमातीच्या मुला मुलींसाठी आश्रम शाळा सुरू केली.

–  1994  मोराणे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय सुरू केले.

–  1996 सिद्धार्थ सहकारी बँकेच्या स्थापनेत पुढाकार, दोन वेळा चेअरमन.

–  1974 पासून सुगावा मासिक सुरू केले.

–  समाज प्रबोधन संस्था मासिकेचे पदाधिकारी.

–  पीपल्स इंप्रुव्हमेंट ट्रस्टचे विश्वस्त.

–  परिवर्तन मिश्र विवाह संस्थेची स्थापना.

–  हुजूरपागा शिक्षण संस्थेत उषा ताई वाघ पदाधिकारी.

पुरस्कार –

–  69 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आळंदी येथे यशस्वी प्रकाशक म्हणून पुरस्कार.

–  दलित साहित्य अकादमी नवी दिल्लीचा डॉक्टर आंबेडकर फेलोशिप.

–  दलित मुक्तविद्यापीठ गुंटूर आंध्र प्रदेशचा डॉक्टर आंबेडकर फेलोशिप.

–  महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका यांचा समाज प्रबोधन कार्यकर्ता पुरस्कार.

–  औरंगाबाद येथील संस्थेचा लोक कैवारी पुरस्कार.

–  आंबेडकर इंटरनॅशनल मिशन कॅनडा यांचा सुगावा मासिकाला पुरस्कार.

–  प्रकाशन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विपू भागवत पुरस्कार.

–  चार्वाक नागरी पतसंस्था नाशिक यांचा शांताबाई दाणी पुरस्कार.

–  समता प्रतिष्ठान पुणे यांच्यातर्फे दिनकरराव जवळकर पुरस्कार

–  दादासाहेब रुपवते फाउंडेशनचा समाजभूषण पुरस्कार

–  पुणे विद्यापीठात आंबेडकर अध्यासनाच्या संचालक पदी नेमणूक.

–  दया पवार स्मृती पुरस्कार.

–  पुणे विद्यापीठाचा जीवन साधना गौरव पुरस्कार.

–  आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठान जळगाव यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित अस्मिता पुरस्कार.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!