Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन

Spread the love

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झालेल्या चित्रपटांच्या यादीत सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मानकरी ठरलेल्या ‘बार्डो’, तसेच सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेच्या विषयांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेल्या ‘आनंदी गोपाळ’ व ‘ताजमाल’ चित्रपटांच्या टीमसह, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सर्व चित्रकर्मींचे अभिनंदन केले आहे.

६७ व्या राष्ट्रीय पुरस्कारांवर मराठी कलावंतांनी आपली ठळकपणे मोहर उमटवून महाराष्ट्राचा गौरव वाढवल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांना यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हटले आहे की, दिग्दर्शक भीमराव मुंडे  दिग्दर्शित ‘बार्डो’ चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. याच चित्रपटातील ‘रान पेटला…’ गाण्यासाठी सावनी रविंद्र यांना सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘आनंदी गोपाळ’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयाबद्दलचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपटाचे प्रॉडक्शन डिझाइनर सुनिल निगवेकर आणि निलेश वाघ हे उत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइनर पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. राष्ट्रीय एकात्मतेसाठीचा नर्गीस दत्त राष्ट्रीय पुरस्कार ‘ताजमाल’ या सिनेमाला जाहीर झाला आहे. ‘ताश्कंद फाईल’ हिंदी सिनेमासाठी पल्लवी जोशी उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री ठरल्या आहेत. दिग्दर्शक विनोद कांबळे यांच्या ‘कस्तुरी’ हिंदी चित्रपटाला उत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. दिग्दर्शक विवेक वाघ यांचा ‘जक्कल’ मराठी चित्रपट उत्कृष्ट संशोधनात्मक नॉन फीचर फिल्म पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. इतरही अनेक मराठी चित्रकर्मींनी आपल्या कर्तृत्वानं ६७व्या राष्ट्रीय पुरस्कारांवर आपली मोहर ठळकपणे उमटवली आहे. ही मोहर महाराष्ट्राचा गौरव वाढवणारी असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचं कौतुक व अभिनंदन केलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!