Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPolitical : मोठी बातमी : भले देशमुखांचा राजीनामा घेतला जाणार नाही पण खांदेपालट शक्य !!

Spread the love

मुंबई : राज्याचे वनविकास मंत्री आणि शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांवर गंभीर  आरोप  होऊनही त्यांना त्यांच्या पक्ष नेतृत्वाकडून अभय दिले जात असल्याबद्दल मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेचे नेते नाराजी व्यक्त करीत आहेत.

दरम्यान  नाही राजीनामा तर या प्रकरणात अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाची चौकशी लावून त्यांच्यावर गृह खात्याऐवजी इतर खात्याची जबाबदारी देण्यात यावी अशी आग्रही मागणी केली जात आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर शिवसेनेचा दबाव वाढत आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी याबाबत शरद पवार यांनी काय तो निर्णय घ्यावा असे सूतोवाच केले आहे. तर यावर ममुख्यमंत्रीच निर्णय घेतील असे आधीच पवारांनी सांगितले आहे. त्यामुळे अनिल देशमुख चांगलेच कैचीत सापडले आहेत.


प्रारंभी  मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटकयुक्त कार ठेवल्या  प्रकरणी आणि  मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात  भाजपने शिवसेनेला चांगलेच धारेवर धरले होते. या प्रकरणात  गुंतलेले एपीआय सचिन वाझे  काजी शिवसैनिक असल्यामुळे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच टार्गेट केले होते . या प्रकरणात त्यांनी विरोधकांना उत्तरेही दिली होती परंतु हे प्रकरण इतके खोल असेल याची त्यांना खात्री नव्हती परंतु एनआयए च्या पथकाने वाझे यांच्यावर थेट अटकेची कारवाई करताच मुख्यमंत्र्यांनी मनसुख हिरेन प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र एटीएस कडे दिली तेंव्हा त्यातही पोलिसांचाच सहभाग उघड झाला. दरम्यान याची कल्पना आधीच आल्याने शासनाने एपीआय सचिन वाझे आणि दोन पोलिसांना तडकाफडकी निलंबित केले तर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची मुबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी केली.

भाजप  आक्रमक

यामुळे संतप्त झालेल्या परमबीर सिंग यांनी थेट राज्याचे  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे लक्ष्य दिल्याचा आरोप करणारे पत्र  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवून दिले. त्यांच्या या लेटर बॉम्बमुळे चांगलीच खळबळ उडाली . त्यात मुख्यमंत्र्यांनी सावध पवित्र घेत आलेले ईमेल वजा पात्र त्यांचेच आहे का याची खात्री करणे गरजेचे आहे म्हणून वेळ मारून नेली आणि या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी भाष्य करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सुचविले. त्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून पवार यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. दरम्यान  सिंग  यांनी केलेल्या गंभीर आरोपांचे तीव्र पडसाद संदेतही उमटले . या लेटरबॉम्बवरुन भाजपने सचिन वाझे या छोट्या माशाचा नाद सोडत  गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणी केली आहे.

या प्रकरणावरून राज्याचे राजकारण तापलेले असतानाच या प्रकरणात वाझे यांचे नाव मागे पडून गृहमंत्री अनिल देशमुख यांना भाजपने थेट लक्ष्य केले आहे. त्यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीतून रविशंकर प्रसाद तर राज्यातून स्वतः देवेंद्र फडणवीस , भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील किल्ला लढत आहेत. हे लक्षात घेऊन पवारांनी अनिल देशमुख यांना क्लीन चिट देण्याचा दोनवेळा प्रयत्न केला खरा पण याच मुद्द्यावरून परमबीर सिंग सर्वोच्च न्यायालयात गेल्याने प्रकरण अधिक गुंतागुंतीचे होत चालले आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयाच्या याचिकेत खा . डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणात भाजप नेत्यांना ओढण्यासाठी राज्य सरकारकडून दबाव येत असल्याने आपली बदली केल्याचा गंभीर आरोप केल्याने पुन्हा एकदा सरकारच आरोपीच्या पिंजऱ्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

निवृत्त न्यायमूर्तींकडून चौकशीचे संकेत

या सर्व पार्श्वभूमीवर पवारांनीही सावध पवित्र घेत  एका बाजूला गृहमंत्री अनिल देशमुख यांना अभय दिले असले तरी १०० कोटीचे प्रकरण गंभीर असल्याने दुसऱ्या बाजूला ज्येष्ठ आयपीएस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांच्यामार्फत चौकशी करण्याची सूचनाही केली. तसेच हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असल्याचेही स्पष्ट केले. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा मुद्दा भाजपने लावून धरला आहे. तर आता मुख्यमंत्र्यांनी यावर शरद पवार यांनीच निर्णय घयावा असे म्हटले आहे. दरम्यान या प्रकरणात निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशी केली जाईल असे संकेत देण्यात आले असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर विचार होईल असे सांगण्यात येत आहे.

दरम्यान या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून डॅमेज कंट्रोलसाठी मंत्रिमंडळात फेरबदल केले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अर्थात हे बदल तत्काळ व्हावेत असा शिवसैनिकांचा दबाव असून यापूर्वी धनंजय मुंडे यांचे लिव्ह इन रिलेशनशीपचे प्रकरण घडूनही राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी बगल दिली तर शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांचा  मात्र राजीनामा घेतला गेला. तोच न्याय  गृहमंत्री अनिल देशमुख  यांना लावावा किना त्यांच्याकडे असलेले गृह खाते काढून त्यांना दुसरे  खाते देण्यात यावे अशी चर्चा पुढे येत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!