Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

20 मार्चपर्यंत बाळ बोठे पोलिस कोठडीत

Spread the love

यशस्विनी महिला ब्रिगेडचे अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांडमधील प्रमुख सूत्रधार असलेले आरोपी बाळ बोठे यांना अहमदनगरच्या पोलिसांनी अटक केली आहे. आज त्यांना पारनेर न्यायालयात हजर करण्यात आले तेव्हा आरोपी बाळ बोठे यांना 7 दिवसांची म्हणजे 20 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अहमदनगरचे पोलीस अधीक्षक यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहिती नुसार, बाळ बोठे यांना हैदराबाद येथून अटक करण्यात आली आहे. बाळ बोठे ज्या रूममध्ये थांबले होते त्या रुमला बाहेरून कुलूप लावण्यात आले होते. तसेच ते आत्महत्या करणार होते त्यांच्या खिशात सुसाईड नोट सापडली होती. त्यांचा नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाल्यास कोणाला संपर्क करावा, यासंदर्भातील माहिती सुसाईड नोटमध्ये देण्यात आली होती, असेही अहमदनगरच्या पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

30 नोव्हेंबर रोजी रेखा जरे यांची हत्या करण्यात आली होती. हत्या झाल्यानंतर सुपा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करत मारेकऱ्यासह पाच आरोपींना अटक केली. या आरोपींकडे चौकशी केल्यानंतर मुख्य सूत्रधार असलेल्या बाळ बोठे यांनी सुपारी देऊन ही हत्या केल्याची माहिती पुढे आली. बाळ बोठे यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी पाच पथके तैनात करू विविध जिल्ह्यांमध्ये छापे देखील टाकले. मात्र, बाळ बोठे यांना अटक करण्यात पोलिसांना अपयश आले. मात्र, बाळ बोठे हैदराबाद येथे असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी बाळ बोठे यांना हैदराबाद येथील एका हॉटेलमधून अटक केली. इतकेच नाही तर बाळ बोठेला मदत करणाऱ्या इतर पाच जणांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे ज्या रूममध्ये बाळ बोठे होते त्या रुमला बाहेरून कुलूप लावण्यात आले होते. या अटकेसाठी पोलिसांनी 5 दिवस विशेष ऑपरेशन केले. या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत एकूण 11 आरोपींना अटक केली आहे. तब्बल 102 दिवसानंतर पोलिसांनी बाळ बोठे यांना अटक केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!