बोगस नियुक्ती, कोर्टाच्या आदेशाने शिक्षणाधिकार्यासहित चौघांवर गुन्हा
औरंगाबाद माध्यमिक शिक्षणविभागाचे शिक्षणाधिकारी- वाळूज औद्योगिक परिसरातील ज्ञानमंदीर कनिष्ठ महाविद्यालयाचे संस्थापक यांनी संगनमताने बोगस शिक्षकाची नेमणूक केल्याप्रकरणी कोर्टाच्या आदेक्षाने वेदांतनगर पोलिस ठाण्यात शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
१५एप्रिल २०१९ ते १०मार्च २१ याकाळात शिक्षणाधिकारी बी.बी.चव्हाण यांना हाताशी धरुन वाळूज औद्योगिक परिसरातील ज्ञानमंदीर महाविद्यालयाचे संस्थापक काका जाधव,त्यांची पत्नी कल्पना,सहशिक्षक शाम गोलारयांनी मंगला रमेश धुमाळ या महिलेची बोगस नियुक्ती करुन शासनाची फसवणूक केली. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अनिल कंकाळ करत आहेत.