Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

खुनाच्या गुन्ह्यात निर्दोष सोडलेल्या आरोपींना २३ वर्षांनी खंडपीठाने ठोठावला १० वर्ष सश्रम कारावास

Spread the love

औरंगाबाद – खुनाच्या गुन्ह्यात हिंगोली जिल्हान्यायालयाने निर्दोष सोडलेल्या १०आरोपींपैकी सहा आरोपींना खंडपीठाने सुमोटो याचिका दाखल करवून वेगवैगळ्या शिक्षा सुनावल्या.

१९९८ साली हिंगोली जिल्ह्यातील खापरखेडा गावात राशन दुकानातून धान्य कोटा का मिळाला नाही ? असे विचारणार्‍या इसमाला मारहाण करत डोक्यात दगड घालून ठार केले होते. या प्रकरणात हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल होऊन कांबळे कुटुंबातील दहा जणांना पोलिसांनी अटक करुन हिंगोली जिल्हासत्र न्यायालयासमोर उभे केले असता सबळ पुराव्या अभावी दहाही आरोपी निर्दोष सुटले होते. हे प्रकरण हिंगोली ग्रामिण पोलिस आणि सरकारी वकीलांनी गांभिर्याने न हाताळल्यामुळे खंडपीठाने या प्रकरणी सुमोटो याचिका दाखल करुन घेतली. दरम्यानच्या काळात दहा आरोपींपैकी चौघांचा नैसर्गिक मृत्यू झाला. त्यामुळे न्या. रविंद्र घुगे व न्या. बी.यू. देबडवार यांच्या खंडपीठाने या प्रकरणातील साक्षी पुरावे नव्याने तपासले. व सहा आरोपींना सश्रम कारावास व १० हजार रु.दंडाची शिक्षा सुनावली.

२०आॅगस्ट ९८ रोजी रात्री ८वा. मोहन नावाच्या व्यक्तीने खापरखेड्यातील भास्कर कांबळै यांच्या राशन दुकानावर जाऊन मागिल महिन्याचे धान्याचा कोटा मागितला. त्यामुळे चिडलेल्या भास्कर कांबळे ने घरातील सदस्यांच्या मदतीने मोहन चा मारहाण करत डोक्यात दगड घालून खून केला. या प्रकरणात पोलिसांनी भास्कर कांबळे सहित बाबू, रामचंद्र, तुकाराम, नाथा, ग्यानोजी,शिवाजी, शोभा आणि अंतकला अशा दहा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला. हा खून अंधारात झाल्याचा पुरावा आरोपींच्या वकीलाने हिंगोली जिल्हा न्यायालषात सादर केला. त्यामुळे सबळ साक्षी पुरावे अभावी सर्व आरोपी निर्दोष सुटले.पण खंडपीठाने या प्रकरणात सुमोटो दाखल करुन पुन्हा नव्याने साक्षी पुरावे तपासले आरोपींपैकी भास्कर अंतकला, ग्यानोजी आणि विनोद कांबळेचा नैसर्गिक मृृत्यू झाला तर बालू कांबळे ला दहा वर्ष सश्रम कारावास व इतर पाच आरोपींना दंड व सक्तमजुरी ठोठावण्यात आली. या प्रकरणात सरकार पक्षा तर्फे अॅड. राजेंद्र सानप यांनी काम पाहिले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!