Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सचिन वाझे यांनी फडणवीस यांचे विधानसभेतील आरोप फेटाळले

Spread the love

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ स्फोटकांसह जी स्कॉर्पिओ कार पार्क करण्यात आली होती, त्या कारच्या मालकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या सर्व प्रकारावर संशय घेताना याप्रकरणी सुरुवातीला तपास अधिकारी म्हणून नेमण्यात आलेले सचिन वाझे यांचे नाव घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहे. तसेच हा सारा घटनाक्रमक संशयास्पद असून याप्रकरणी एनआयए मार्फत चौकशी व्हावी अशी आमची मागणीही देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी केली आहे. त्यावर सचिन वाझे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

फडणवीस यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने माध्यमांनी सचिन वाझे यांची प्रतिक्रिया घेतली दरम्यान, त्यांनी फडणवीस यांचे आरोप फेटाळे असून, काही बाबींवर प्रकाश टाकला आहे. ते म्हणाले, मनसुख हिरेन प्रकरणाबाबात मला काहीच माहीत नाही. आता माहिती मिळाल्यानंतर मी तिकडेच निघालो आहे. मनसुख यांनी तीन दिवसांपूर्वी ठाणे आणि मुंबई पोलीस आयुक्तांना एक लेखी तक्रार दिली होती. त्यात पोलीस आणि पत्रकार त्रास देत असल्याने मानसिक तणावाखाली असल्याचे त्यांनी नमूद केले होते.

दरम्यान, तुमचे आणि हिरेन याचे याआधी अनेकदा बोलणे झाले असा दावा फडणवीस यांनी केला आहे, असे विचारले असता त्यांनी तसे बोलू देत. त्याबाबत तेच तुम्हाला सागू शकतील, असे त्रोटक उत्तर वाझे यांनी दिले. तसेच, सर्वात आधी घटनास्थळी पोहचल्याचा फडणवीसांचा दावाही त्यांनी यावेळी फेटाळला. ‘मी पहिला घटनास्थळी गेलो नाही. सर्वात आधी गावदेवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, त्यानंतर वाहतूक शाखेचे पोलीस, नंतर परिमंडळ दोनचे उपायुक्त आणि त्यांच्या पाठोपाठ क्राइम ब्रॅन्चची टीम तिथे पोहचली. त्यात मी होतो, असे सचिन वाझे म्हणाले.

अंबानींच्या च्या घरासमोरील घटनाक्रम संशय निर्माण करणारा… फडणवीस यांनी केले गंभीर आरोप

आपलं सरकार

Click to listen highlighted text!