Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : शिवजयंतीचा बंदोबस्त सूरु होण्या पूर्वी दोघींचे मंगळसूत्र हिसकावले

Spread the love

किराणाचावडी, टिव्ही सेंटर परिसरातील घटना

औरंंंगाबाद : शिवजयंतीचा बंदोबस्त सुरु होण्यापूर्वी चोरट्याने ११तोळ्यांचे दोन मंगळसूत्र चोरुन पोलिसांना फक्त नावापुरता बंदोबस्त करण्याचा सल्ला कृतीतून दिला. दोन ठिकाणी चोरट्याने आज सकाळच्या प्रहरी शहराच्या दोन जणींचे मंगळसूत्र हिसकावून नेले. या दोन्ही घटना किराणा चावडी आणि टिव्ही सेंटर भागात घडल्या असून दोन्ही घटनेतील चोरटा एकच असून तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद  झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शकुंतला जयचंद सेठी (वय ७४, रा.किराणा चावडी, राजाबाजार) या नित्यनेमाने रोज सकाळी राजाबाजार मधील मंदिरात देवपूजेसाठी जात असतात. शुक्रवारी देखील त्या सकाळी साडेआठी वाजेच्या सुमारास घरातून मंदिराकडे एकट्याच पायी जात होत्या. घराच्या काही अंतरावर जाताच तोंडाला मास्क बांधलेला एक दुचाकीस्वार त्यांच्या जवळून गेला व पुढे काही अंतरावर जाऊन त्याने दुचाकी वळवून आणली व सेठी यांना काही कळण्याच्या आतच त्यांच्या गळ्यातील सोन्याचे आठ तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावून शहागंजच्या दिशेने सुसाट वेगाने निघुन गेला.
दुसNया घटनेत, हडको एन-११ परिसरातील गजानन नगर येथील रहिवासी सुनंदा शरद पाटील (वय ५३) या सकाळी घरासमोरील आंगण झाडत होत्या. त्यावेळी विनाक्रमांकाच्या हिरव्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या चोरट्याने सुनंदा पाटील यांच्या गळ्यातील तीन तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुनंदा पाटील यांनी गळ्यातील मंगळसूत्र हाता धरून ठेवल्याने चोरट्याच्या हाती फक्त पाच गॅ्रम वजनाचे सोनेच लागले. विविध भागात मंगळसूत्र चोरी करणा-या चोरट्याविरूध्द अनुक्रमे सिटीचौक आणि सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!