Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SadNews : बस कालव्यात कोसळून 40 ठार झाल्याची भीती , 30 जणांचे मृतदेह बाहेर काढले

Spread the love
फोटो सौजन्य : नई दुनिया

नवी दिल्ली  |  मध्य प्रदेशच्या सीधी येथे मंगळवारी सकाळी एक बस कालव्यात कोसळून भीषण अपघात झाल्याचे वृत्त आहे.  या अपघातात 40 जण दगावल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून बचाव पथकाने  आतापर्यंत 30 जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. या  बसममध्ये 54 पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही अपघात रामपूरच्या नैकिन परिसरात सकाळी साडेसातच्या आसपास झाला आहे.

एएनआयच्या वृत्तानुसार ही बस सीधी येथून सतनाकडे जात होती. सतना शहराकडे जात असताना बसला अपघात झाला. मार्गातच असलेलया नैकिनजवळ बस एका कालव्यात कोसळली. चालकाचे  नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे . या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सीधीमधील अधिकाऱ्यांसोबत बातचीत केली आहे आणि बचावकार्य जलदगतीनं करण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान SDRF च्या टीमने  बचावकार्य सुरू केले  आहे. याठिकाणी क्रेनसह अन्य मशीनरीही बोलावल्या गेल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून बाणसागर धरणातून कालव्याचे पाणी थांबविण्यात आले आहे. कालव्यातील पाण्याची पातळी कमी करण्यासाठी त्याचं पाणी सिहावल कालव्यात पाठविले  जात आहे. आतापर्यंत 7 जणांना बाहेर काढण्यात यश आल्याची माहिती एएनआयने  दिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!