Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#UnionBudget2021-22 : सर्व सामान्यांची जीवनशैली उंचावणारा अर्थसंकल्प – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Spread the love

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत आज सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुक करण्यात आले आहे. “सर्व सामान्यांची जीवनशैली उंचावण्यावर या अर्थसंकल्पात जोर देण्यात आला आहे.  हा अर्थसंकल्प सर्वच क्षेत्रात अत्यंत सकारात्मक बदल आणणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण, अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर आणि त्यांच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

या अर्थसंकल्पाच्या केंद्रस्थानी शेतकरी आहेत तसेच यामुळे देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यात विकास पोहचेल, अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केलीय. शेतकऱ्यांच्या हितार्थ या अर्थसंकल्पात अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. बाजारसमित्यांना आणखीन मजबूत करण्याची तरतूद करण्यात आलीय. या अर्थसंकल्पाच्या हृदयात गाव आहे, शेतकरी आहेत, असेही पंतप्रधान म्हणले.

हा अर्थसंकल्प नव्या भारताच्या आत्मनिश्वासाला आणखीन दृढ करणार आहे. यामुळे देशातील पायभूत सुविधा आणखीन मजबूत होतील, सोबतच तरुणांना अनेक संधी यामुळे उपलब्ध होतील. सुरुवातीलाच चांगला प्रतिसाद मिळाला, असे खूपच कमी अर्थसंकल्प पाहायला मिळाले. आजचा अर्थसंकल्प त्यापैंकीच एक आहे. अनेक आव्हाने समोर असतानाही आमच्या सरकारने अर्थसंकल्प पारदर्शक बनवण्यावर भर दिला आहे. महिलांचे आुयष्य सोप बनवण्यासाठी त्यांचे आरोग्य, पोषण आणि पायाभूत सुविधेत अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. विकास आणि नोकऱ्या निर्ममाण करण्यासाठी याचा फायदा होईल. करोनाकाळात भारत खूपच प्रो-अॅक्टिव्ह राहिला आणि हा अर्थसंकल्प करोनाकाळातील आत्मनिर्भर भारत मिशनला आणखीन पुढे घेऊन जाईल. या अर्थसंकल्पाचे तज्ज्ञांनीदेखील कौतुक केले आहे, असे म्हणत आपल्या सरकारचे नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!