Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : खासगी बस ५० फूट खोल दरीत कोसळली

Advertisements
Advertisements
Spread the love

रत्नागिरी जिल्ह्यात  मुबंई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खासगी बसला आज पहाटे चार वाजताच्या सुमारास कशेडी घाटात भोगाव गावाजवळ भीषण अपघात झाला. बस रस्ता सोडून ५० फूट दरीत कोसळली. या अपघातात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू  झाला. तर १५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना पोलादपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मदत कार्यात वाचवण्यात आलेल्या जखमी प्रवाशांना पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Advertisements

सदर अपघातातील चिंतामणीची बस मुंबईच्या सायन येथून कणकवलीकडे जात असताना पहाटे चार वाजता कशेडी घटातील ५० फुट दरीत कोसळली. या बसमध्ये अंदाजे ३० प्रवासी प्रवास करत होते. दरम्यान, पोलादपूर पोलीस अपघातस्थळी पोहोचले आहे. मदतकार्य सुरु आहे. या प्रकरणी मदत कार्य जोरात सुरु आहे. या बसमधील बहुतेक प्रवासी हे संगमेश्वर येथील रहिवाशी आहेत. या अपघातात सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. साई राणे असं मृत मुलाचे नाव असुन तो देवगडचा राहणारा आहे. ही  बस एका झाडावर अडकली म्हणून मोठा अनर्थ टळला. बसमध्ये अडकून पडलेल्या वृद्ध व्यक्तीला बाहेर काढण्यात आलं आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!