Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AhmadanagarNewsUpdate : रेखा जरे खून प्रकारणातील मुख्य आरोपी बाळ बोठेचा अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळला

Spread the love

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या आणि यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या खून  प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ ज. बोठे याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने आज फेटाळला. त्यामुळे पोलिसांना गुंगारा देत फरारी असलेल्या बोठे याच्यासमोरील अडचणी आता वाढल्या आहेत.

या खून प्रकरणात  नाव आल्यापासून फरार असलेल्या बोठे याने अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी हा अर्ज दाखल केला होता. त्याला विरोध करताना पोलिसांनी सुनावणीच्यावेळी बोठे याला समक्ष हजर राहण्याचा आदेश देण्याची मागणी कोर्टाकडे केली होती. ती कोर्टाने फेटाळून लावली होती. त्यानंतर अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. आरोपीतर्फे अॅड. महेश तवले यांनी युक्तिवाद केला होता. या प्रकरणात द्वेषातून बोठे याचे नाव गोवल्याचा आरोप त्यांनी केला होता. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. सतीश पाटील यांनी बाजू मांडली. या प्रकरणात पोलिसांकडे भक्कम पुरावे असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि लेखी पुराव्यांचा समावेश असल्याचे त्यांनी कोर्टात सांगितले होते. यावर कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. आज तो सुनावण्यात आला. जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांनी बोठे याचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला आहे.

अहमदनगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट शिवार येथे ३० नोव्हेंबरच्या  रात्री आठच्या सुमारास रेखा जरे यांची गळा चिरून हत्या झाली होती. या प्रकरणात पाच आरोपी अटकेत असून मुख्य सूत्रधार बाळ ज बोठे पसार आहे. बोठे याच्या विरोधात पोलिसांकडे भक्कम पुरावे आहेत. जरे यांची हत्या नेमक्या कोणत्या कारणासाठी करण्यात आली, हे बोठेच्या चौकशीतूनच समोर येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पोलीस आरोपी बोठे याचा कसून शोध घेत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!