IndiaCrimeUpdate : स्वतःच्या ७ वर्षीय मुलीचा गळा आवळून हा नराधम बाप रात्रभर मृतदेहाजवळच झोपून राहिला

उत्तर प्रदेशाच्या कानपूरमध्ये आपल्या सात वर्षांच्या मुलाची हत्या केल्यानंतर नराधम बाप रात्रभर मृतदेहाजवळ झोपून राहिल्याची घटना उघडकीस आली आहे . पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अलंकार श्रीवास्तव असे आरोपीचे नाव असून, त्याची पत्नी सारिका हिने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. रविवारी सकाळी अलंकार झोपेतून उठला आणि त्याने मुलाची गळा आवळून हत्या केल्याचे तिला सांगितले. हे ऐकून तिला धक्काच बसला. तिने खोलीत धाव घेतली. त्यानंतर नातेवाईकांना फोन करून माहिती दिली. त्यांनी या घटनेबाबत पोलिसांना कळवले.
शनिवारी रात्री अलंकारने मुलाची हत्या केली. त्यानंतर रात्रभर तो त्याच्या मृतदेहाजवळ झोपून राहिला, असे सारिकाने पोलिसांना सांगितले. या घटनेने तिला आणि तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे जबाब नोंदवून घेण्यात येत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. काही महिन्यांपूर्वी अलंकारची नोकरी गेली. त्यानंतर त्याला नैराश्य आले होते. दरम्यान, सारिकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी अलंकारविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. मुलाचा मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे, अशी माहितीही पोलिसांनी दिली.