CoronaNewsUpdate : महत्वाची बातमी : मुलांना सांभाळा , दुसऱ्या लाटेचा मुलांना अधिक धोका , युनिसेफचा इशारा
कोरोनाच्या संकटामुळे सर्व जग त्रस्त झाले असून पहिल्या लाटेतूनच लोकांची सुटका झालेली नसताना जगात दुसऱ्या लाटेची चर्चा सुरु झाली आहे. ड्रामायन कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा लहान मुलांवर मोठा परिणाम होईल त्यामुळे आपल्या मुलांना सांभाळा असे युनिसेफनं म्हटलं आहे. करोनाचा प्रभाव असाच कायम राहिल्यास भावी पिढीचं भविष्य धोक्यात येईल, असा इशारा युनिसेफने दिला आहे.
यासंबंधीच्या वृत्तानुसार युनिसेफने १४० देशांमध्ये पाहणी केली. त्यांच्या अहवालात म्हटले आहे कि , कोरोना महामारीत मुलांसाठी धोका कमी होण्याऐवजी वाढला असून, जागतिक महामारीमुळे अनेक देश आर्थिक संकटाचा सामना करत असल्याचंही या पाहणीतून समोर आलं आहे. १४० देशांमध्ये करण्यात आलेल्या पाहणीच्या अहवालातून सध्याच्या पिढीसमोर उद्भवलेल्या तीन प्रकारचे धोके दिसून आले आहेत. या धोक्यांमध्ये ककोरोना महामारीचे परिणाम, आवश्यक सेवांमध्ये पडलेला खंड आणि वाढती गरिबी आणि विषमतेचा समावेश करण्यात आला आहे. वाढत्या गरिबी ही मुलांसमोरील सर्वात मोठं संकट असल्याचं अहवालात म्हटलं आहे.
लसीकरणातही अडथळे येण्याची शक्यता
दरम्यान कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लसीकरणातही अडथळे येण्याची शक्यता आहे. जर वेळेत लसीकरण आणि आरोग्याशी निगडीत सेवांमध्ये सुधारणा केली नाही, तर जवळपास २० लाख मुलांचा पुढील १२ महिन्यांमध्ये मृत्यू होण्याचा धोका आहे. तसेच करोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे युवा पिढीची काम करण्याची क्षमता कमी होऊ शकते, असा इशाराही यूनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड म्हणजेच युनिसेफचं दिला आहे.
या अहवालात असेही म्हटले आहे कि , जगातील एकतृतीयांश देशामधील आरोग्य सेवांमध्ये १० टक्क्यांची घट झाली आहे. संसर्गाची भीतीमुळे ही घट झाली असून, नियमित लसीकरण, बाह्यरुग्णांची केली जाणारी देखभाल, लहान मुलांना होणारा संसर्ग, गर्भवती महिलांसाठीची आरोग्य सेवा यावर याचा परिणाम झाला असल्याचं युनिसेफनं म्हटलं आहे. ६५ देशांमध्ये घरोघरी जाणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या भेटींमध्येही मागील वर्षीच्या तुलनेत घट झाली आहे.