Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCoronaUpdate : गेल्या २४ तासात ५०९२ रुग्णांची वाढ , ८२३२ रुग्णांना डिस्चार्ज , ११० रुग्णांचा मृत्यू

Spread the love

गेल्या २४ तासात राज्यात आज ११० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून दिवसभरात ५ हजार ९२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर ८ हजार २३२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता ९६ हजारांपर्यंत खाली आली आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आजची आकडेवारी प्रसिद्ध केली. आज ८ हजार २३२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर आजपर्यंत एकूण १५ लाख ७७ हजार ३२२ करोना बाधित रुग्णांनी या आजारावर मत करण्यात यश मिळवले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.७१ टक्के एवढे झाले आहे. आज ५ हजार ९२ नवीन रुग्णांचे निदान झाले तर ११० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. राज्यातील मृत्यूंचा एकूण आकडा ४५ हजार २४० इतका झाला आहे. सध्या राज्यातील करोना मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९४ लाख ४० हजार ५३५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख १९ हजार ८५८ (१८.२२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १० लाख ५१ हजार ३२१ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ७ हजार ९१२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

दरम्यान राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा १ लाखांच्या खाली आला असून त्यात दररोज काही हजारांची घट पाहायला मिळत आहे. आज हा आकडा ९६ हजार ३७२ इतका असून त्यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पुणे जिल्ह्यातील करोनारुग्णांचा आकडा १७ हजारापर्यंत खाली आला आहे. गेले काही महिने पुणे जिल्ह्यात मुंबई ठाण्यापेक्षाही करोना बाधित रुग्ण होते. आता पुणे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा मुंबईपेक्षा कमी झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या १७ हजार २७९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर मुंबई पालिका हद्दीत १७ हजार ६०३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. ठाणे जिल्ह्यातील हा आकडा १४ हजार ९८० इतका खाली आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!