Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaNewsUpdate : देशातील कोरोनारुग्णांची संख्या अब तक ५६ लाखांच्या वर…

Spread the love

गेल्या २४ तासात देशात ८३ हजार ३४७ नवे करोनाबाधित आढळले आहेत. तर, १ हजार ८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  आजघडीला  कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५६ लाख ४६ हजार ११ वर पोहचली आहे. सध्या कोरोनाबाधित झालेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या  ९ लाख ६८ हजार ३७७ इतकी असून डिस्चार्ज झालेल्यांची रुग्णसंख्या ४५ लाख ८७ हजार ६१४ आहे . आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ९० हजार २० इतकी  आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एएनआयने हे वृत्त दिले आहे. २ सप्टेंबरपर्यंत देशभरात ६,६२,७९,४६२ नमूने तपासणी झाली तर, ९ लाख ५३ हजार ६८३ नमूने काल तपासण्यात आले आहेत. दरम्यान ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट येण्याची चिन्ह दिसत असून रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. करोना व्हायरसची दुसरी लाट रोखण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी लोकांना ‘शक्य असेल तर घरातूनच काम करा’ असे आवाहन केले आहे तसेच बार आणि हॉटेल्स लवकर बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!