Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : स्वामी अग्निवेश यांच्या मृत्यूवर असंवेदनशील ट्विट करणाऱ्या सेवानिवृत्त आयपीएस अधिकाऱ्यावर टीकेची झोड

Spread the love

 

सेवानिवृत्त आयपीएस सीबीआयचे माजी संचालक  एम. नागेश्वर राव यांनी  आपल्या ट्विटरवर आर्य समाजाचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांच्या मृत्यूच्या बातमीवर विचित्र आणि असंवेदनशील प्रतिक्रिया  लिहिल्यानंतरत्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे.  ‘स्वामी अग्निवेश भगवे कपडे घातलेले हिंदूविरोधक होते. त्यांच्यामुळे हिंदुत्त्ववादाचं फार मोठं नुकसान झालं’, असं म्हणत ‘माझी यमराजांकडे तक्रार आहे, ते एवढे दिवस का थांबले?’ असे  ट्विट नागेश्वर राव यांनी केलं आहे.

स्वामी अग्निवेश तुम्ही तेलुगू ब्राह्मण म्हणून जन्माला आलात याची मला लाज वाटते, असंही नागेश्वर राव यांनी लिहिलं होतं. दरम्यान Twitter ने संध्याकाळी उशिरा हे ट्वीट काढून टाकलं. Twitter च्या धोरणांमध्ये बसत नसल्याने काढून टाकत असल्याचा मेसेज त्यानंतर आला. एका आयपीएस अधिकाऱ्याने आणि सीबीआय  संचालकपद भूषवलेल्या व्यक्तीने या पातळीवर येऊन निवर्तलेल्या व्यक्तीबद्दल बोलावं यावरून सोशल मीडियावर खळबळ उडाली.

दरम्यान इंडियन पोलिस फाउंडेशनने यावर त्वरित Tweet करत राव यांचा निषेध केला. पोलीस कर्मचारी आणि नागरिक यांच्यात समन्वयाचं काम करणारी ही स्वयंसेवी संस्था आहे. ‘स्वतःला IPS म्हणवणाऱ्या या माजी अधिकाऱ्याचा द्वेषमूलक मजकूर निंदनीय आहे. तमाम पोलीसदलासाठी विशेषतः तरुण अधिकाऱ्यांचं मानसिक खच्चीकरण करणारा हा संदेश आहे. राव यांनी पोलिसांच्या खाकी गणवेशाचा अवमान केला आहे’, असं  IPF ने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. प्रशांत भूषण यांनीदेखील राव यांच्यावर सडकून टीका केली आहे. अशा माणसाला सीबीआय प्रमुख केला, असं म्हणत त्यांनी सध्याच्या एनसीबी  प्रमुखांवरही त्यांनी टीका केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!