Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : राज्यात दिवसभरात आढळले 22,084 नवे रुग्ण , 391 रुग्णांचा मृत्यू तर 13 हजार रुग्णांवर यशस्वी उपचार

Spread the love

राज्यात गेल्या २४ तासात 22,084 नवे रुग्ण आढळले. तर 391 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ही 10,37,765 एवढी झाली आहे. तर मृत्यूसंख्या 29,115 एवढी झाली आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज 20 हजारांपेक्षा जास्त रुग्ण निघत असल्याने सरकारची चिंता वाढली आहे. राज्यात दिवसभरात 13 हजार 489  रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. राज्याचा मृत्यूदर 2.81 एवढा झाला आहे. राज्यात सध्या  2,79,768 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आतापर्यंत राज्यात सव्वा सात लाख रुग्ण कोरोनामुक्त. एका दिवसात झाल्या 92 हजार पेक्षा जास्त चाचण्या. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70.2 टक्के आहे .   रुग्णसंख्या वाढण्यास पूर्ववत झालेले व्यवहार, वाढणारी गर्दी, लोकांचा बेफिकीरपणा, मास्क न लावणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करणं ही मुख्य कारणं आहेत असा तज्ज्ञांचा दावा आहे. त्याचबरोबर टेस्टिंगची संख्याही वाढत असल्याने रूग्णांचं प्रमाणही वाढत आहे.कोरोनाची प्रसार आता ग्रामीण भागात झाल्याने रूग्णसंख्या वाढत आहे. कोरोनाचा प्रसार वाढत असतांनाच आता कोरोनाची भीती कमी होत आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!