Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

KanganaTweetControversy : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीनंतर कंगनाची विषयावर दिली हि प्रतिक्रिया….

Spread the love

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले कि , आमच्यासाठी कंगना राणावतचा विषय संपला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत १५ ते २० मिनिटांच्या बैठकीत विविध विषावर चर्चा झाल्याचे सांगून पत्रकारांना ते म्हणाले कि , ‘सोनिया, पवार नाराज असल्याची अफवा पसरवू नका’ कंगना हा विषय आमच्यासाठी संपलाय. आम्ही ते विसरून गेलोय आणि  ‘नेहमीच्या सामाजिक, राजकीय कामाला लागलोय’ ‘ आता ती काय ट्विट करतेय  ते वाचलं नाही, आम्ही फक्त सामना वाचतो’

काल मोदी सरकारने दिलेल्या वाय प्लस सेक्युरिटीत आणि मुंबई पोलिसांच्या तंगड्या बंदोबस्तात घरी पोहोचल्यानंतर  ट्विटरच्या माध्यमातून व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करीत त्यांच्यावर  व्यक्तिगत पातळीवर टीका केली होती . याविषयी पत्रकारणनी खा. संजय राऊत यांना छेडले असता , राज्यातील ११ कोटी मराठी जनतेने हे ऐकलं आहे अशी प्रतिक्रिया दिली. मात्र  त्यांनी कंगना वादावर सविस्तरपणे बोलण्यास नकार दिला. कंगनाच्या ऑफिसवर महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईवर बोलताना ते म्हणाले की, “महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे असं तुम्ही म्हणत असाल तर तिथे एक कायदेशीर विभाग आहे. तुम्ही यासंबंधी महापौरांशी बोलू शकता, ज्या गोष्टी आम्हाला माहिती नाहीत त्यावर मत व्यक्त करणार नाही”. कंगनाकडून मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करण्यात आल्याच्या प्रश्नावर ११ कोटी मराठी जनतेने ऐकलं आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

दरम्यान कंगना राणावतविरोधात विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कंगनानं सोशल मीडियावर टाकलेल्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा  एकेरी उल्लेख करीत त्यांचे बॉलीवूड माफियांशी संबंध असल्याचं निराधार वक्तव्य करून बदनामी त्यांची बदनामी केली असल्याने कंगनाविरोधात विक्रोळी कोर्टात अब्रूनुकसानीचा खटला चालणार असल्याचे फिर्यादी  अॅड.नितीन माने यांनी म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!