Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraEducationUpdate : दहावीचा निकाल जाहीर , मुलींनी यंदाही मारली बाजी , कोकण सर्वात पुढे तर मराठवाडा मागे….

Spread the love

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यातल्या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली. एकूण ९५.३० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण बोर्डाची टक्केवारी सर्वाधिक आहे. राज्यातील ८,३६० शाळांचा निकाल १०० टक्के लागलेला आहे. एकूण १७ लाख ९ हजार २६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी १५ लाख १ हजार १०५

दृष्टिक्षेपात निकाल

परीक्षेला नोंदणी केलेले एकूण विद्यार्थी – १७ लाख ६५ हजार ८९८

परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी – १७ लाख ९ हजार २६४

एकूण उत्तीर्ण विद्यार्थी – १५ लाख १ हजार १०५

एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी – ९५.३० टक्के

विभागनिहाय टक्केवारी

कोकण – ९८.७७ टक्के

पुणे- ९७.३४ टक्के

कोल्हापूर -९७.६४ टक्के

अमरावती – ९५.१४ टक्के

नागपूर – ९३.८४ टक्के

मुंबई- ९६.७२ टक्के

लातूर – ९३.०७टक्के

नाशिक – ९३.७३ टक्के

औरंगाबाद – ९२ टक्के

निकालाची वैशिष्ट्ये –

– कोकण विभाग अव्वल ९८.७७ टक्के

– औरंगाबाद सर्वात कमी ९२ टक्के

– गतवर्षीच्या तुलनेत निकालात १८.२० टक्के वाढ

– राज्यातील २४२ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण

आपलं सरकार

Click to listen highlighted text!