Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सीएसएमटी भागातील इमारतीचा भाग कोसळला ; अनेक जण ढिगाऱ्याखाली उडकल्याची भीती

Spread the love

 

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील फोर्ट भागातील GPO पोस्ट ऑफिस समोरील पाच मजली ‘भानुशाली’ बिल्डिंगची एक बाजू कोसळली आहे. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मात्र, आणखी काही जण ढिगाऱ्याखाली उडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशमन दलाच्या 14 गाड्या, NDRF आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे.

मदत कार्यात कॅमेरा आणि अत्याधुनिक उपकरणांची मदत घेण्यात येत आहे. घटनेची भीषणता लक्षात घेवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनास्थळी पोहोचले आहेत. मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग आणि बीएमसी आयुक्त आयुक्त इकबालसिंग चहल यांच्याकडून घटनेचा आढावा घेतला.

गुरूवारी संध्याकाळी पावणे पाचच्या सुमारास फोर्ट येथील जीपीओ समोरील कबुतरखान्याजवळ असलेली भानुशाली इमारतीचा काही भाग कोसळला आहे. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जणांवर जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, त्यांची प्रकृती देखील चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. भानुशाली बिल्डिंग मालकाचे नाव मोती भाटीया असे आहे. ही इमारत धोकादायक होती, तिला नोटीसही बजावण्यात आली होती. दुर्घटनाग्रस्त इमारत ही रहिवाशी आणि व्यावसायिक आहे. दुर्घटना घडली तेव्हा इमारतीत 20 जण असण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि बीएमसीचे आयुक्त इकबालसिंग चहल  घटनास्थळी दाखल झाले.

भानुशाली ही इमारत पाच मजली आहे. गुरुवारी याच इमारतीचा जवळपास 40 टक्के भाग कोसळला. मुंबईत गेल्या तीन दिवसापासून जोरदार पाऊस सुरु आहे. दरम्यान, इमारत कोसळण्याची गुरुवारी दिवसभरातील ही दुसरी घटना आहे. मुंबईतील मालाडमध्ये अब्दुल हमीद मार्गावरील मालवणी परिसरात एका चाळीतील दुमजली घर कोसळले. ही दुर्घटना गुरूवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान ढिगाऱ्याखाली दबून एका 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. तर 6 नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. बुधवारी देखील मरिन लाईन परिसरातील एका इमारतीचा भाग कोसळला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!