Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

चर्चेतल्या बातमीला पवारांचे उत्तर , म्हणाले फडणवीस प्रसिद्धीसाठी बोलतात तर पडळकरकडे लक्ष देण्याची गरज नाही…

Spread the love

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  यांनी एका पत्रकार परिषदेत राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपाचे उत्तर देताना त्यांचा तो प्रसिद्धी स्टंट असल्याची टीका करून  भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तवव्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे प्रतिपादन करून आपली बाजू जनतेसमोर मांडली. शरद पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत. फडणवीस काहीना काही बोलून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी खोचक टीका शरद पवार यांनी यावेळी केली आहे.

गोपीचंद पडळकरांना काही महत्त्व देण्याची गरज नाही, त्यांचं अनेकवेळा डिपॉझिट जप्त झालं आहे. ‘कशाला बोलायचं.’, अशा म्हणत शरद पवार यांनी पलटवार केला आहे.  याशिवाय कारखाने चालू न होणे हे देशासाठी चिंताजनक आहे. आता सर्व व्यवहार चालू झाले पाहिजेत.  पेट्रोल आणि डिझेल दर वाढ याचा परिणाम फक्त गाडीवर होत नसून सर्व गोष्टी वर त्याचा परिणाम होतो. राजू शेट्टी यांची भेट. आमदारकी बाबत राजू शेट्टी यांच्या पक्षात गैरसमज होते.  इथून पुढे लोकांना कोरोना सोबत जगावं लागणार आहे. दरम्यान शरद पवार यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केल्याप्रकरणी गोपीचंद पडळकर यांच्याविरुद्ध बारामतीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पडळकरांविरोधात राज्यातील पहिला गुन्हा आहे.

‘शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. राज्याचे नेतृत्त्व त्यांनी केले पण बहुजन समाजातील लोकांवर अन्याय करण्याची त्यांची भूमिका राहिलेली आहे. त्यांच्या कडे कोणतीही विचारधारा नाही. फक्त छोट्या छोट्या समाजाना भडकवायचे आणि त्यांना आपल्या बाजूला करायचे आणि अन्याय करायचा एवढेच काम पवार करत आहेत’ अशी जहरी टीका पडळकरांनी केली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!