Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

चर्चेतली बातमी : दाऊदच्या कोरोनाबाबत आणि मृत्यूबाबत भावाने केला हा खुलासा

Spread the love

दिवसभर कोरोनामुळे चर्चेत असलेल्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याची बायको महजबीन या दोघांच्याही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचं  वृत्त वाहिन्यांवर दिवसभर व्हायरल झाले होते. एवढेच नाही तर या दोघांनाही कराचीतल्या लष्करी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचं बोललं जात होतं. दरम्यान सोशल मीडियावर दाऊदचा कोरोनामुळं मृत्यू झाल्याच्याही  चर्चा रंगल्या आहेत. मात्र दाऊदचा भाऊन अनीसनं IANS शी बोलताना या सर्व अफवा असल्याचं सांगितल्यानं या  विषयावर आता पडदा पडला आहे.

याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार दाऊद आणि त्याचं कुटुंबीय कराचीमधल्या अतिसुरक्षित मानल्या जाणाऱ्या भागात राहतात. या भागात लष्करी अधिकाऱ्यांची वसाहत आहे. दाऊदचा भाऊ असिननं असा दावा केला आहे की, त्याचा भाऊ आणि कुटुंबातील सर्व सदस्य पूर्णपणे निरोगी आहेत. त्यामुळं दाऊदचा कोरोनामुळं मृत्यू किंवा त्याला कोरोनाची लागण खरच झाली आहे का? अशा चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत. दरम्यान, दाऊद आणि त्याच्या बायकोला कोरोना झाल्याच्या वृत्तानंतर त्याच्या गार्ड्स आणि इतर स्टाफला क्वारंटाइन करण्यात आल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र यावर अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही आहे. तसेच, पाकिस्तान सरकारकडूनही कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही आहे. यातच आज सोशल मीडियावर दाऊद इब्राहिमचा कोरोनामुळं मृत्यू झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. या केवळ चर्चा असून यात कितपत सत्या आहे, याचा पाठपुरावा केला जात आहे.

कुख्यात दाऊदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषीत करण्यात आलं आहे. यानंतरही पाकिस्तान त्याला पूर्ण संरक्षण देत आहे. दाऊद पाकिस्तानात असल्याचे पुरावे भारताने पाकिस्तानला वारंवार दिले होते. मात्र पाकिस्तानने ते कधीच मान्य केलेलं नाही. १९९३ च्या मुंबईतल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर दाऊद पाकिस्तानात पळून गेला होता. तेव्हापासून भारतीय सुरक्षा यंत्रणा त्याच्या मागावर असून तो सगळ्यांच्या हातावर तुरी देण्यात यशस्वी ठरला आहे. यातच आता कोरोनामुळं पुन्हा एकदा दाऊद चर्चेत आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!