Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : लॉयन्स फॅमिली औरंगाबादच्या प्रमुख समन्वयकपदी पूर्वप्रान्तपाल लायन महावीर पाटणी यांची निवड

Spread the love

औरंगाबाद  लॉयन्स फैमिली औरंगाबाद च्या नुकतेच झालेल्या बैठकीत सर्वानुमते पूर्वप्रान्तपाल लायन महावीर पाटणी यांची लायंस परिवार औरंगाबाद च्या मुख्य समन्वयक पदावर निवड करण्यात आली. नुकतीच आंतरराष्ट्रीय संचालक डॉ नवल मालू यांच्या अध्यक्षतेखाली यशोदा चेस्ट हॉस्पिटल येथील लॉयन्स कार्यालयात बैठक सम्पन्न जाली या बैठकीत लॉयन्स चे पूर्व मल्टीपल कौंसिल चेअरमन संदीप मालू, उपप्रान्तपाल सी ए विवेक अभ्यंकर ,पूर्व प्रान्तपाल तनसुख झांबड ,पूर्व प्रान्तपाल महावीर पाटनी,पूर्व प्रान्तपाल राजेश राऊत आदि प्रमुखाची या प्रसंगी उपस्थिति होती . प्रारंभी लॉयन्स फैमिली औरंगाबाद चे पूर्व समन्वयक लायन एम के अग्रवाल यांचे आकस्मिक निधन झाले, बैठकी च्या प्रारंभी एम के अग्रवाल याना लॉयन्स फॅमिली औरंगाबाद तर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली , या प्रसंगी पूर्वप्रान्तपाल तनसुख झाम्बड़ यानी लायन्स फैमिली औरंगाबाद च्या सर्व कार्या बद्दल माहिती दिली,

लॉयन्स क्लब ऑफ़ औरंगाबाद मिडटाउन या क्लब ची स्थापना 30 वर्षा पूर्वी झाली या क्लब च्या माध्यमातून लॉयन्स डायलिसिस सेन्टर चे अत्यंत महत्वपूर्ण कार्य गेली ६ वर्षापासून अविरत सुरु आहे या डायलिसिस सेन्टर तर्फे आज पावेतो अनेक रुग्णाचे डायलिसिस अत्यंत माफक दरात आणि अनेकदा निःशुल्क ही करण्यात येतात,याच क्लबतर्फे २ एम्बुलेन्स(Cardiac Care) शहरात कार्यरत आहेत शेकडो रुग्ण सुरक्षितपणे स्थलांतरित करण्याचे कार्य या माध्यमातून करण्यात येते, याच क्लब तर्फे गेल्या 21 वर्षापासून औरंगाबाद येथील घाटी हॉस्पिटल येथे सुमारे 20000 लीटर चे पिण्याच्या पाण्याचे जलकुम्भ उभारण्यात आलेले आहे ज्याचा फायदा हजारो रुग्नांचे नातेवाइक आणि नागरिक घेत आहेत आज ही सेवा अखंडपणे चालू आहे, कोविड १९ मुळे शहरात लॉक डाउन लागल्या नंतर आज पावेतो सुमारे 2 लक्ष्य 25 हजार गरजुना मोफत भोजन व्यवस्था याच क्लब चे अध्यक्ष कुलभूषण जैन आणि चंद्रकांत मालपाणी यांचे मार्गदर्शनाखाली अविरत सुरु आहे, या क्लब चे डॉ नवल मालू हे सध्या अंतराष्ट्रीय संचालक पदावर कार्यरत असून एशिया खंडातील सुमारे 60 देशाचे नेतृत्व ते लॉयन्स इंटरनेशनल चे शिकागो अमेरिका येथील प्रमुख केंद्रातुन ते करत आहे त्यांच्या माध्यमातून करोड़ो रूपयाचे फंड्स हे भारतभरात येत आहेत त्यांच्या प्रयत्नाने औरंगाबाद येथील ब्लड बैंक , लॉयन्स नेत्रालय,लायंस डायलिसिस सेन्टर, घाटी मधे नुकतेच घाटी रक्तपेढीना देण्यात आलेल्या विविध उपकरण ,या अश्या अनेक सामाजिक उपक्रमासाठी त्यांची मदत लाभली आहे,याच क्लब चे सदस्य शहरातील विविध सामाजीक ,धार्मिक ,शैक्षणिक,राजकीय अशा  सुमारे 22 संस्था , संघटनेच्या माध्यमातून सैदव सामाजिक कार्यात ज्यांचा अग्रणी सहभाग असतो अशे लायन महावीर पाटनी हे ही याच क्लब च्या माध्यमातून लॉयन्स प्रान्त 323H2 च्या प्रान्तपाल पदी वर्ष 2010 मधे यशस्वीपने कार्य करुण आपल्या नेतृत्व गुणाची छाप जनमानस आणि लायंस परिवारा वर जडवली आहे,*

लॉयन्स क्लब ऑफ औरंगाबाद क्लासिक या क्लब चे शहरात मोठे कार्य विशेष करुण 2 एम्बुलेन्स आणि शहरातील अंध व अपंग साठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध करुण देण्याचे कार्य या क्लब मार्फत गेली अनेक वर्षापासून सुरु आहे याच क्लब चे राजेश राऊत हे ही लॉयन्स प्रान्त 323 H2 च्या प्रान्तपाल पदावर राहून सम्पूर्ण प्रांतचे कार्य पाहिले आहे. एक प्रांत म्हणजे 12 भौगोलिक जिल्हे मिळून एक प्रांत होतो यामध्ये मराठवाडा खान्देश विभाग येतो या सोबतच लायन्स क्लब आइकॉन च्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील उद्यमी व्यक्तित्व संदीप मालू हे ही लॉयन्स प्रान्त 323h2 व त्यानंतर मल्टीपल डिस्ट्रिक्ट चे शहरातील पहिले मल्टीपल कौंसिल चेयरमैन म्हणून सम्पूर्ण मल्टीपल 3234 याचे यशस्वी पने नेतृव केले आहे ,या वर्षी लॉयन्स प्रान्त 323 H2 ची धुरा लायन्स क्लब औरंगाबाद मेट्रो संस्थापक सदस्य सी ए विवेक अभ्यंकर यानी लाभलेले आहे या आणि अश्या अनेक लीडर्स आणि सामाजिक कार्यकर्ते घड़वणाऱ्या या लॉयन्स परिवार औरंगाबाद चे शहरात खूप मोठे योगदान आहे, अश्या लॉयन्स परिवार औरंगाबाद च्या प्रमुख समनवयक पदी पूर्वप्रान्तपाल लायन महावीर  पाटणी यांची वर्णी करण्यात आली आहे ,सम्पूर्ण लॉयन्स परिवारातील सर्व विविध क्लब्स ना एकसंघ करून  कार्य करण्याची मोठी जवाबदारी त्याच्या वर टाकण्यात आली आहे ती त्यानी सहर्ष स्वीकारलेली  आहे ,त्यांच्या या निवड़ी बदल औरंगाबाद शहरातील विविध सामाजिक ,धार्मिक राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी व लायन्स सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!