Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#KoronaVirusUpdate : Video : औरंगाबादची संख्या 216 वर , आरोग्य प्रशासनाविषयी तक्रारी वाढल्या, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दरारा नुसताच नावाला…!!

Spread the love

औरंगाबाद एकूण रुग्णसंख्या 216


औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आज सकाळी एका कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाल्याने औरंगाबादमधील मृत्यूची संख्या ८ झाली असून आज दिवसभरात सायंकाळी ३२ आणि रात्री आणखी ७ रुग्णांची भर पडल्याने एकूण कोरोनग्रस्त रुग्णांची संख्या २१६ झाली आहे. औरंगाबाद शहरातील कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे अधिकारी , कर्मचाऱ्यांमध्ये कुठलीही सुसूत्रता नसून विशेष म्हणजे प्रमुख पदांवर राज्यात नावाजलेले कर्तव्यदक्ष अधिकारी असतानाही असे घडावे हे वाईट आहे. खासकरून संशयित रुग्ण आणि कोरोना झालेल्या रुग्णांना एकत्रित ठेवणे,  कोरोना झालेल्या रुग्णांसोबत कोरोना नसलेल्या रुग्णांना  बसविणे, लोकांना विश्वासात न घेणे आदी प्रकार वाढत चालल्यामुळे सुद्धा शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.


एका बाजूला राज्यातील रुग्ण कमी व्हावेत यासाठी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे अहोरात्र परिश्रम घेत असले तरी स्थानिक पातळीवरचे अधिकारी आणि कर्मचारी मात्र फार गंभीर नसल्याचे दिसत आहेत. दरम्यान लोकांना विश्वासात घेणे , त्यांना आरोग्याचे महत्व आणि कोरोनाचे गांभीर्य समजवून सांगणे यात जिल्हा प्रशासन आणि महापालिका यांच्यात कुठलाही समन्वय दिसत नाही. महापालिका बरखास्त होईपर्यंत महापौर नंदकुमार घोडेले सातत्याने जनतेच्या आणि आरोग्य यंत्रणेच्या संपर्कात होते त्यामुळे थोडाफार ताळमेळ होता. रोज दुपारी ५ वाजता स्वतः नंदकुमार घोडेले आणि महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी फेसबुक लाईव्हवर जाऊन शहरातील सर्व परिस्थितीची माहिती नागरिकांना देत होते परंतु आता हे सर्व बंद झाले आहे. त्याच बरोबर जिल्हाधिकारी, महापालिका प्रशासक, विभागीय आयुक्त यांचा कुठलाही वचक कर्मचाऱ्यांवर नाही. हे अधिकारी समोर असताना संबंधित कर्मचारी आपण फार चोखपणे काम करतो असे दाखवतात आणि त्यांची पाठ फिरताच पुन्हा ये रे माझ्या मागल्या सारखे वागतात. स्वतः हे कर्मचारी कसे वागतात हे अधिकाऱ्यांनी तपासण्याची गरज आहे.

खरे तर शहराचे आयुक्त आस्तिककुमार पांडे , विभागीय आयुक्त केंद्रेकर आणि तरुण जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासारखे कर्तव्यदक्ष अधिकारी असतानाही औरंगाबादवर अशी वेळ यावी हे चिंताजनक आहे. या सर्व अधिकारी महोदयांनी जिल्हा आणि स्थानिक प्रशासनावर अधिक लक्ष ठेवण्याची गरज आहे कारण याशिवाय सध्या कुठलीही प्राथमिकता नाही. त्या तुलनेने पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद आणि जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांचा बंदोबस्त तेवढा चोख चालू आहे हे उल्लेखनीय !! 


आज आम्हाला जमणार नाही , उद्या जातो …म्हणून ते अद्याप गेलेच नाही !! 

औरंगाबादकर नागरिक जेंव्हा महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या हेल्प लाईनला  फोन करून शहरातील काही ठिकाणी कोरोनाचे संशयित रौग्णांची माहिती देण्याचा प्रयत्न करतात तेंव्हा आलेल्या कॉलला गांभीर्याने घेतले जात नसल्याचा अनुभव आहे. एका महिलेने  दि . २९ रोजी दुपारच्या सुमारास पहिल्यांदा महापालिका हेल्पलाईनला फोन करून संशयित रुग्णाचा सर्व पत्ता दिला. दरम्यान महापालिकेचे पथक दिलेल्या पत्त्यावर आता जाणार असे त्या महिलेला वाटले आणि ती महिला निशचिन्त झाली पण दुपारची संध्याकाळ झाली तरी पथक तिकडे फिरकलेही नाही. या महिलेने सायंकाळी पुन्हा फोन केला तेंव्हा आमच्याकडे लोक नाहीत . आम्ही आता नाही जाऊ शकत उद्या बघू … असे उत्तर दिले आई फोन कट केला. त्यानंतर सादर महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कोरोना हेल्पलाइनला फोन करून हीच माहिती दिली. तिकडेही सगळे ऐकून घेतले गेले. पत्ता लिहून घेतला , महापालिकेचे लोक असे काय बोलले ? आम्ही बघतो असे बोलून फोन बंद केला परंतु त्यांचे पथक अद्याप तीन दिवस होऊनही दिलेल्या पत्त्यावर गेलेच नाही. शेवटी त्या महिलेच्या कुटुंबीयांनी स्वतःच संबंधित संशयित रुग्णाला कोविड हॉस्पिटलमध्ये दाखवायला नेले तेंव्हा त्या रुग्णाला डॉक्टरांनी उपचारासाठी भरती करून घेतले. विशेष म्हणजे या महिलेच्या संपर्कातील एका कोरोना पॉझिटिव्ह महिलेचे निधन झाले असून सादर महिलेचे आई – वडील , बहीण -भाऊ सर्व जण उपचारार्थ दाखल आहेत.


कोरोनाग्रस्त रुग्णाचा भयानक अनुभव….

या शिवाय सोशल मीडियावर एका तरुणाने कथन केलेला अनुभव तर खूपच भयानक आहे. त्याच्या शेजारच्या एका महिलेचे निधन झाले नंतर समजले कि , ती महिला कोरोना पॉझिटिव्ह होती. तेंव्हा गल्लीतल्या आमच्यासारख्यांना काळजी वाटल्याने आम्ही स्वतः जाऊन टेस्ट करून घेतल्या वास्तविक आम्हाला कुठलेही लक्षण नव्हते पण आमचे अहवाल पॉझिटिव्ह आले आणि त्या महिलेच्या घरातील लोकांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यांनी कोणाचे कसे नमुने घेतले ते त्यांचे त्यांनाच माहित. आता आम्हाला ज्या ठिकाणी ठेवले आहे . त्या ठिकाणी खूपच भयानक हाल आहेत आणि कोरोनाचे रुग्ण यामुळेच वाढत आहेत.


औरंगाबादची परिस्थिती चिंताजनक 

औरंगाबाद शहरातील गारखेडा परिसरातील गुरूदत्त नगर येथील 47 वर्षीय रुग्णास 27 एप्रिल रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचा आज सकाळी 6.20 मिनिटांनी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे सध्या घाटीच्या डेडिकेटेड कोविड रुग्णालयात 11 कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आज सायंकाळी सात वाजेपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील 32 नवीन कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली आहे. म्हणून आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 209 झाली आहे, असे घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी कळवले आहे.

नवीन कोरोनाबाधित रूग्णांमध्ये (कंसात रुग्ण संख्या) संजय नगर, मुकुंदवाडी (16), रोहिदास नगर, मुकुंदवाडी (2), नूर कॉलनी (2), वडगाव (1), असेफिया कॉलनी (3), भडकल गेट (1), गुलाबवाडी (2), महेमुदपुरा (1), सिटी चौक (1), जय भीम नगर (2) टाऊन हॉल (1) या परिसराचा समावेश आहे. याशिवाय रात्री उशिरा आलेल्या माहितीनुसार नूर कॉलनी , आसिफाय कॉलनी , एन ५ विजयश्री कॉलनी, किल्ले अर्क आणि जयभीम नगर येथे प्रत्येकी एक आणि गुलाबवाडी पदांपुर येथी दोन अशा सात रुग्णांचा समावेश आहे.

व्यवसायाने वाहन चालक असलेल्या गुरू दत्तनगर येथील या रूग्णास सात दिवसांपासून ताप, कोरडा खोकला आणि चार दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत होता. संबंधित लक्षणे कोविड 19 आजाराची दिसत असल्याने त्यांना संशयित कोविड कक्षात भरती केले होते. तिथे त्यांच्या लाळेचे नमुने घेऊन चाचणीसाठी पाठविल्यानंतर तो अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना कोविड कक्षात हलविण्यात आले. तिथे त्यांना कृत्रिम ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. न्यूमोनिआ, श्वसन विकार असल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आज दुपारी चार वाजेपर्यंत 46 रुग्णांची तपासणी करण्यात आली. घाटीत सध्या 47 रूग्ण भरती आहेत. सहा कोविड निगेटीव्ह बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आल्याचेही घाटीच्या अधिष्ठाता डॉ. येळीकर, माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी कळविले आहे.

मिनी घाटीतील एक जण कोरोनामुक्त

मिनी घाटीतील कोरोना रुग्णांपैकी 22 वर्षीय कोरोनाबाधिताची निगेटीव्ह आल्याने या कोरोनामुक्त रुग्णास आज सुटी देण्यात आली आहे. एकूण 85 जणांचे स्वॅब घेण्यात आले. 68 जणांचे अहवाल प्राप्त झाले. 85 अहवाल येणे अपेक्षित आहेत, असे जिल्हा सामान्य रूग्णालय प्रशासनाने कळवले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!