#CoronaAurangabadCurrentNewsUpdate : औरंगाबाद १७७, दिवसभरात ४७ पॉझिटिव्ह , तीन दिवस मोंढा बंद

गेल्या चार दिवसांपासून औरंगाबाद शहरात कोरोनाग्रस्त रुंगांची संख्या वाढत चालल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. महापालिका आणि जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार आज दिवसभरात ४७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. दरम्यान औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने उद्या दि . १ मे ते ०३ मे २०२० असे तीन दिवस जुना आणि नवा मोंढा मार्केट बंद राहील असे कळविण्यात आले आहे. दरम्यान व्यापारी महासंघाच्यावतीने या दोन्हीही भागातील निर्जंतुकीकरण आणि व्यापारी व हमाल बांधवांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी आणि दुकानदारांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ व जनरल किराणा मर्चंट्स असोसिएशन चे अध्यक्ष जगन्नाथ काळे , सरचिटणीस लक्ष्मीनारायण राठी , संजय कांकरिया आणि निलेश सेठी यांनी केले आहे.
औरंगाबाद शहरात आज संध्याकाळपर्यंत एकूण 47 रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 177 झाली आहे.
सदरील रुग्ण किल्लेअर्क, जयभीमनगर, असेफिया कॉलनी, नूर कॉलनी, कैलाश नगर, चिकलठाणा, सावरकर नगर, बेगमपुरा, संजय नगर, खडकेश्वर, स्काय सिटी बीड बायपास, रोहिदास नगर, अजिज कॉलनी (नारेगाव), रोशनगेट या परिसरातील आहेत, असे जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने कळवले आहे.
घाटीत बारा कोरोनाबाधितांवर उपचार सुरू
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय(घाटी) मध्ये दुपारी चार वाजेपर्यंत 51 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 12 जणांचे स्वॅब घेण्यात आले. पाच जणांचा अहवाल निगेटीव्ह आलेला आहे. पाच जणांचा येणे बाकी आहे. तर घाटीमधील दोन रुग्णाचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आला आहे.
पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्लॅट न. 28, वाघ टॉवर, बेगमपुरा येथील 32 वर्षीय पुरूष आणि बारी कॉलनी, रोशन गेट येथील 70 वर्षीय पुरूष यांचा समावेश आहे. तर जिल्हा सामान्य रुग्णालयातून घाटीत संदर्भीत करण्यात आलेल्या नूर कॉलनीतील 63 वर्षीय पुरूष यांच्यावर घाटीमध्ये उपचार सुरू आहेत. त्यामुळे सध्या घाटीत एकूण 12 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
मागील चोविस तासात तीन रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. त्यापैकी 01 रुग्णाचा अहवाल कोविड निगेटीव्ह आला आहे. दोन रुग्णाचा अहवाल येणे बाकी आहे. सहा कोविड निगेटीव्ह रुग्ण् बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे, असे घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर आणि माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी कळवले आहे.
आज पॉझिटिव्ह वाढलेल्या रुग्णांची यादी पुढील प्रमाणे…
१. किल्ले अर्क : ०५
२. जयभीम नगर : ०८
३. असीफीया कॉलनी : ०२
४. . कैलास नगर : ०१
५. चिकलठाणा :०१
६. शहा नगर : ०१
७. हिलाल कॉलनी : ०१
८. बेगमपुरा : ०१
९. मुकुंदवाडी : २०
१०. खडकेश्वर : ०१
११. रोशनगेट : ०१
१२. नरेगाव : ०२
१३. स्काय सिटी , बीड बायपास : ०१
१४. नूर कॉलनी : ०२