Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : रेशनिंग विषयी तक्रारी असल्यास येथे संपर्क साधण्याचे आवाहन …

Spread the love

केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत राज्यात रेशनिंगसाठी हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. जनतेने रेशनिंग संदर्भातील तक्रारी आणि माहिती मिळविण्यासाठी १८००२२४९५० किंवा १९६७ या नि:शुल्क हेल्पलाइन क्रमांकाचा वापर करावा, असं आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागां केलं आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीत अन्नधान्य व इतर जीवनावश्यक चीजवस्तू रेशनिंग दुकानात उपलब्ध करून देण्याबरोबरच त्या मिळवण्यात अडचणी येऊ नयेत याकडं सरकारचा कटाक्ष आहे. त्या दृष्टीनं हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. मात्र, त्या हेल्पलाइनबाबतही जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळंच रेशनिंगसाठीच्या तक्रारीसाठी/रेशनिंगची माहिती मिळविण्यासाठी हेल्पलाइन क्रमांकाचा वापर करा किंवा ईमेल वा ऑनलाईन तक्रार प्रणालीचा वापर करून आपली तक्रार नोंदवा, असं आवाहन जनतेस करण्यात आलं आहे.

राज्यस्तरीय हेल्पलाईन ही सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार असून त्याचा हेल्पलाइन क्रमांक : १८००२२४९५०/१९६७ (नि:शुल्क) आहे. अन्य हेल्पलाइन क्रमांक : ०२२-२३७२०५८२ / २३७२२९७० / २३७२२४८३ ईमेल- [email protected], ऑनलाइन तक्रार नोंदविण्यासाठी mahafood.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन तक्रार निवारण प्रणाली याचा वापर करा. तसेच मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्र नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले असून हा कक्ष सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु राहील. त्याचा हेल्पलाईन क्रमांक- ०२२-२२८५२८१४, ईमेल- [email protected] असा आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!