Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

घरातून भांडण झाल्याने बाहेर पडलेल्या महिलेवर टेम्पो चालकासह दोघांचा अत्याचार

Spread the love

घरात झालेल्या भांडणानंतर आळंदी येथून घर सोडून आपल्या नातेवाईकांकडे पेरणे फाटा येथे जाण्यासाठी निघालेल्या २९ वर्षीय महिलेवर टेम्पो चालकांने आणि क्लिनरने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या पीडित महिलेला टेम्पो चालकाने रात्रभर टेम्पो पिंपरी परिसरात फिरवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिला  महामार्गावर सोडून दिले. मंगळवारी रात्री ११ ते बुधवारी पहाटे  ४ च्या दरम्यान हा सर्व प्रकार घडला असल्याची फिर्याद पीडित महिलेने आळंदी पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यावरून  पोलिसांनी आयशर टेम्पो चालक आणि क्लिनर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता मंगळवारी रात्री आकाराच्या सुमारास घरात भांडणे झाल्याने नातेवाईकांकडे जाण्यासाठी आळंदी येथे वाहनाची वाट पाहत उभा होती. त्यावेळी त्या ठिकाणी आयशर टेम्पो आला. क्लिनरने त्या महिलेस पेरणे फाटा येथे सोडतो असे सांगून आत बसवले. टेम्पो आळंदीतून बाहेर पडला. टेम्पो चालकाने टेम्पो पेरणे फाटाच्या दिशेने न नेता पिंपरी चिंचवड परिसरात आणला. रात्रभर टेम्पो पिंपरी चिंचवड शहरातील वेगवेगळ्या परिसरात फिरवला. दरम्यानच्या काळात ड्रायव्हर आणि क्लिनरने पीडित महिलेवर बलात्कार केला. बुधवारी पहाटे चारच्या सुमारास पीडित महिलेस पुणे बेंगळुरू महामार्गावर सोडून टेम्पो चालक आणि क्लिनर पसार झाले. पीडित महिलेने त्यानंतर तेथील एका सोसायटीच्या वॉचमनच्या मदतीने पोलिसांशी संपर्क साधल्यावर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. शिरगाव पोलिस चौकीत या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करून, तो तपासासाठी आळंदी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!