Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : जामिनावर बाहेर आल्यावर दुसऱ्याच दिवशी घरफोडी करणारा कुख्यात घरफोड्या गुन्हेशाखेच्या जाळ्यात

Spread the love

औरंंंगाबाद : हर्सुल कारागृहातून जामीनावर सुटता होताच दुस-या दिवशीच घरफोडी करून १ लाख २० हजाराचा ऐवज लंपास करणा-या अट्टल घरफोड्यास गुन्हे शाखा पोलिसांनी जेरबंद केले. सूर्यकांत उर्फ सनी गोपीनाथ जाधव (रा.क्रांतीनगर) असे घरफोड्याचे नाव असून पोलिसांनी त्याच्या ताब्यातून चोरी गेलेले १ लाख २० हजार रूपये किमतीचे  तीन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त केले आहे.
हर्सुल कारागृहातून ३ मार्च रोजी जामीनावर सुटका होताच सुर्यकांत उर्फ सनी जाधव याने ४ मार्च रोजी नागेश्वरवाडी परिसरातील मुकुंद  अपार्टमेंन्टमध्ये घरफोडी केली होती. घरफोडी केल्यानंतर चोरी केलेले मंगळसूत्र सूर्यकांत उर्फ सनी जाधव याने आपल्या घरात लपवून ठेवले असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गौतम वावळे, सहाय्यक फौजदार शेख नजीर, जमादार चंद्रकांत गवळी, सुधाकर राठोड, सुधाकर मिसाळ, आनंद वाहुळ, रविंद्र खरात आदींनी सूर्यकांत उर्फ सनी जाधव याला क्रांतीनगर भागातून अटक केली.

सूर्यकांत उर्फ सनी जाधव याच्या नावावर २५ घरफोड्यांची नोंद
कुख्यात घरफोड्या असलेल्या सूर्यकांत उर्फ सनी जाधव याच्या नावावर २५ घरफोड्यांची नोंद आहे. एका घरफोडीच्या गुन्ह्यात अटक झाल्यावर तो हर्सुल कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. ३ मार्च २०२० रोजी सूर्यकांत उर्फ सनी जाधव याची कारागृहातून जामीनावर सुटका झाल्यावर दुस-याच दिवशी त्याने नागेश्वरवाडी भागात घरफोडी केली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!