Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : गुन्हे शाखेच्या विविध कारवायांमध्ये चौघांना मुद्देमालासह अटक

Spread the love

औरंगाबाद – गुन्हेशाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गौतम वावळे , मनोज शिंदे आणि अजबसिंग जारवाल यांनी तीन वेगळ्या कारवायात ४ आरोपी अटक करंत १लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
दरम्यान एकूण २५ घरफोड्या करणारा कुख्यात सनी उर्फ सूर्यकांत गोपीनाथ जाधव (२५) हा ३मार्च रौजी जामिनावर सुटुन बाहेर आल्यावर दुसर्‍याच दिवशी नागेश्वरवाडीत घरफोडी केली. या प्रकरणात एपीआय गौतम वावळे यांना सनी शहरात फिरंत असल्याची माहिती खबर्‍याने दिली होती. मंगळवारी सनीला वावळे यांच्या पथकाने ताब्यात घेत चौकशी केली असता ४मार्च रौजी नागेश्वरवाडी परिसरात घरफोडून तीन तोळ्याचे मंगळसूत्र लंपास केल्याची कबुली दिली.या प्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. सनी ने १ लाख २० हजारांचे मंगळसूत्र पोलिसांच्या हवाली केले.सनीला गुन्हेशाखेने क्रांतीचौक पोलिसांच्या हवाली केले.

दुसर्‍या एका प्रकरणात धुलीवंदना निमित्त नेशेच्या गोळ्या विक्री करणार्‍या दोघांना अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्याने अटक केली . त्यांच्या  ताब्यातून १९ हजार ४३८ रुचा. मुद्देमाल जप्त केला.प्रविण रामकृष्ण हिवरडे(३६) रा.पडेगाव आणि जफरखान इस्माईलखान (३५) रा.बायजीपुरा. अशी अटक आरोपींची नावे आहेत.गुन्हेशाखा पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांना खबर्‍याने सांगितले की, होळी निमित्त शहरात नशेच्या गोळ्या विक्री करण्यासाठी वरील दोघे वाळूज कडून शहरात येत आहेत. त्यानुसार गायकवाड यांनी एपीआय मनोज शिंदे यांना आदेश दिले की, अन्न व औषध निरीक्षक कार्यालयाची मदत घेऊन कारवाई पूर्ण करा. म्हणून अन्नव औषध प्रशासनाचे निरीक्षक राजगोपाल बजाज यांच्या समवेत एपीआय शिंदे यांनी वाळूज टोलनाक्यावर हिवरडे आणि जफरखान यांच्या कारची झडती घेतली असता. विना प्रिस्क्रिप्शन  मिळालेल्या जप्त करंत वरील आरोपींच्या विरोधात वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन आरोपींना वाळूज पोलिसांच्या हवाली केले.

तिसर्‍या कारवाईत हर्सूल कारागृहाकडून संचित रजा संपवून फरार असलेला आरोपी शेख अश्पाक शेख हसन (३३) रा. मिसारवाडी याला एपीआय अजबसिंग जारवाल यांनी जेरबंद केले. अश्फाक डिसेंबर १९पासून फरार होता. शेख अश्फाक हा जन्मठेपेची शिक्षा भोगंत होता. २६/११रोजी एक महिन्याच्या संचित रजेवर शेख अश्फाक हर्सूल कारागृहातून बाहेर पडला होता.बुधवारी दुपारी १वा. अश्फाक घरी येणार असल्याची माहिती गुन्हेशाखेला मिळाली होती. त्यानुसार जारवाल यांनी सापळा रचून शेख अश्फाकला  जेरबंद करून  सिडको पोलिसांच्या हवाली केले.
वरील तिन्ही कारवायांमधे सहाय्यक पोलिस आयुक्त डाॅ.नागनाथ कोडे आणि पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.वरील कारवाईत पोलिसकर्मचारी शिवाजी झिने, राजेंद्र सोळूंके, प्रभाकर राऊत,आयझेक कांबळे, विलास वाघ, ज्ञानेश्वर पवार,आनंद वाहूळ, रविंद्र खरात, सुधाकर मिसाळ यांनी सहभाग नोंदवला

आपलं सरकार

Click to listen highlighted text!