Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते होणार शिवपूजन , युवानेते अमित ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती, मनपा निवडणुकीची मनसेची तयारी

MNS chief Raj Thackeray addresses a press conference at his residence Krishnakunj in Shivaji Park on Tuesday. Express Photo by Prashant Nadkar. 26.06.2018. Mumbai. *** Local Caption *** MNS chief Raj Thackeray addresses a press conference at his residence Krishnakunj in Shivaji Park

Spread the love

औरंंंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरूवारी (दि.१२) तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. शिवजयंतीनिमत्ताने मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता क्रांतीचौकात शिवपूजन करण्यात येणार आहे. यावेळी मनसेचे युवानेते अमित राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांनी बुधवारी (दि.११) पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दरवर्षी शिवजयंती तिथीनुसार साजरी करण्यात येते. यंदाच्या वर्षी ती भव्य स्वरूपात साजरी करण्यात येणार असून शिवजयंतीनिमित्ताने गुरूवारी शिवपूजन करण्यासाठी पक्षप्रमुख राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सकाळी ११ वाजता क्रांतीचौकात राज ठाकरे यांच्या हस्ते शिवपूजन करण्यात येणार आहे. यावेळी ढोल पथक, लेझीम पथक, नगाडा पथक व शिवकालीन मर्दानी खेळाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. सायंकाळी पाच वाजता शहराचे ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपती मंदीर येथे मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते आरती करण्यात येईल. त्यानंतर राजाबाजार येथील नामफलकाचे उद्घाटन करण्यात येऊन तेथून मुख्य मिरवणूकीस प्रारंभ होणार आहे.
शहागंज, सिटीचौक, गुलमंडी, पैठणगेट, सिल्लेखाना मार्गे ही मिरवणूक क्रांतीचौकात दाखल होईल. या ठिकाणी विद्युत रोषणाईचा कार्यक्रम झाल्यावर अमित राज ठाकरे हे उपस्थितांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतील, त्यानंतर मिरवणूकीचा समारोप करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी सांगितले. यापत्रकार परिषदेस मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांच्यासह मनविसेचे पदाधिकारी संकेत शेटे, विशाल आमराव आदींची उपस्थिती होती.

हिंदुत्वासोबतच विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढणार – सुहास दाशरथे

आगामी औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक हिंदुत्वासोबतच विकासाच्या मुद्यावर लढणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांनी दिली आहे. तसेच मनपाची निवडणूक न लढविता आपण स्वतः माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना टक्कर देणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

शिवसेनेचा हिंदुत्वाचा मुद्दा आता बोथट झाला आहे. शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्यापासून कोसो दुर गेली आहे. आगामी मनपा निवडणूकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंदुत्वासोबतच विकासाच्या मुद्यावर जनतेची मते मागणार असल्याचे जिल्हाध्यक्ष दाशरथे यांनी स्पष्ट केले. तसेच आगामी निवडणूकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना ७५ ते ८० वॉर्डात आपले उमेदवार उभे करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आगामी मनपा निवडणूकीत शिवसेना-भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडून काही चुका होणार असून त्या चुकांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना लक्ष ठेवून असल्याचे दाशरथे यांनी सांगितले.
दरम्यान, शिवसेनेसह इतर पक्षातील नाराज असलेले पदाधिकारी व कार्यकर्ते मनसेच्या संपर्कात असून ते लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करणार असल्याचे संकेतही सुहास दशरथे यांनी यावेळी दिले.

मनपा निवडणूक नियोजित वेळेतच व्हावी
कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे मनपा निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी एमआयएम आणि शिवसेनेच्या वतीने करण्यात येत असली तरी मनपा निवडणूक ही नियोजित वेळेतच व्हावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी केली आहे. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यामुळेच शहराचा विकास रखडला असल्यामुळे त्यांच्याकडून अशा मागण्या होत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी मारला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!